घरताज्या घडामोडीShaheer Sheikh: पवित्र रिश्ता फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनाने निधन

Shaheer Sheikh: पवित्र रिश्ता फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनाने निधन

Subscribe

कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोरोना इन्फेक्शनमुळे आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. अली गोनीने ट्विट करत शाहीर शेखच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली.

‘कुछ रंग प्यार ते ऐसे भी’ (Kuch rang pyaar te aise bhi)  ‘पवित्र रिश्ता2’ (Pavitra Rishta 2)  फेम अभिनेता शाहीर शेखच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले (Shaheer Sheikh father passed away)  शाहीर शेखचे वडील शाहनवाज शेख यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शाहीरचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाशी झूंज देत होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शाहीर शेखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्यासाठी प्रार्थन करण्याचे आवाहनही केले होते. मात्र शाहीरचे वडील आता या जगात नाही.

- Advertisement -

शाहीर शेखच्या वडिलांचे निधन पोस्ट कोविड सिरीयस इन्फेक्शनमुळे झाले. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांना पोस्ट कोरोना इन्फेक्शनमुळे आयसीयूमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत होती. अली गोनीने ट्विट करत शाहीर शेखच्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्याने म्हटलेय ‘शाहीर शेखच्या वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो. शाहीर तू स्ट्रॉग राहा’. शाहीर शेखने मात्र याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. अली गोनीच्या ट्विटवरुन ही माहिती मिळत आहे.

शाहीरने पोस्ट लिहीत म्हटले होते, ‘माझे वडील सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. गंभीर कोरोना इन्फेक्शनचा ते सामना करत आहेत. त्यांना तुमच्या प्रार्थनेची गरज आहे’. शाहीरच्या पोस्टनंतर अनेक कलाकारांनी त्याच्या वडिलांसाठी प्रार्थना केली. अभिनेता करणवीर शर्माने म्हटले होते, ‘ते लवकरच बरे होतील मी त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करेन. तुला कोणत्याही गोष्टीची गरज पडल्यास मला सांग’, असे म्हणत त्याला धीर दिला होता.

- Advertisement -

शाहीर शेखच्या वर्क फ्रंट विषयी बोलायचे झाले तर, शाहीर सध्या पवित्रा रिश्ता2 या मालिकेत काम करत आहे. पवित्र रिश्ताचे शुटींग सुरू असतानाच शाहीर शेखला वडिलांच्या प्रकृतीची माहिती मिळाली आणि तो शुटींग सोडून वडिलांसाठी रुग्णालयात गेला होता.


हेही वाचा – Hana Horka: Covid-19 लसीकरण विरोधी मोहिमेतील सहभाग अंगलट, लस न घेतलेल्या गायिकेचा Corona ने मृत्यू

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -