सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेची झाली अशी अवस्था….

पवित्र संबंध टीमला सुशांतच्या मृत्यूची खबर मिळताच सर्वच अवस्थ झाले.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनाच्या बातमीने बॉलीवूड जगतासह क्रिकेट आणि अन्य क्षेत्रातील मान्यवरांनाही धक्का बसला आहे.  सुशांतचे कुटुंबिय, जवळचे मित्र, कलाकारांना आज आपल्या सुशांत नाही हे सहनच होत नाहीये. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे.

सुशांतने काय पो छे, केदारनाथ, राबता, पीके, सोनचिरीया, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, शुद्ध देसी रोमान्स, ड्राईव्हसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. छिछोरे हा त्याचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला. पण सुशांतने आपल्या करियरची सुरूवात पवित्र रिश्ता या मालिकेपासून केली. या मालिकेने सुशांतला वेगळी ओळख दिली. सुशांतच्या जाण्याचा मोठा झटका या मालिकेतील कलाकारांना बसला आहे.

 

टाइम्स ऑफ इंडियाने सुशांतच्या पवित्र रिश्ता या मालिकेत असणाऱ्या पराग त्यागीची प्रतिक्रीया घेतली असता, परागने सांगितले की,  पवित्र संबंध टीमला सुशांतच्या मृत्यूची खबर मिळताच सर्वच अवस्थ झाले. पराग म्हणाला, उषा नाडकर्णी यांची तब्येत बिघडली होती. त्याला विश्वास नव्हता की सुशांत आता या जगात नाही. त्याचवेळी मंजू शाह आणि उर्वरित टीम ही बातमी ऐकून हादरले. याविषयी जेव्हा मी अंकिताशी बोललो तेव्हा तीची तब्येत खूपच खराब झाली होती. असे परागने सांगितले. तिला विश्वासच बसत नव्हता की सुशांत असे पाऊल उचलू शकेल, तिला या बातमीबद्दल खात्री नव्हती.

View this post on Instagram

❤️?❤️?❤️

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on


हे ही वाचा – सुशांतची आत्महत्या वहिनीला सहन झाली नाही, डिप्रेशनमध्ये झाला मृत्यू!