Pawankhind Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर पावनखिंडची यशस्वी घोडदौड ! 10 दिवसात कमावले इतके कोटी

१८ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पावनखिंड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात १२.१७ कोटींची कमाई केली.

Pawankhind Box Office Collection is 16.17 crores in 10 days
Pawankhind Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर पावनखिंडची यशस्वी घोडदौड ! 10 दिवसात कमावले इतके कोटी

Pawankhind Box Office Collection :  बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाची गाथा उलगडणारा ‘पावनखिंड’ सिनेमा रिलीज झाल्यापासून सिनेमागृहात यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. फर्जंद आणि फत्तेशिकस्त या सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा पावनखिंड या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या रक्ताने इतिहासाच्या विजयी पराक्रमाचे पान पावनखिंड या सिनेमातून दाखवण्यात आला आहे. सिनेमा १८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आणि अवघ्या १० दिवसात सिनेमाने तब्बल १६.१७ कोटींची कमाई केली आहे. मराठी रसिक प्रेक्षकांसाठी ही फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

सिनेमा व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत सिनेमाच्या यशस्वी घोडदौडेची माहिती दिली आहे. हर हर महादेव ! म्हणत तरण आदर्शचे ट्विट सिनेमाचे लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी शेअर केले आहे.

तरण आदर्शने पावनखिंड सिनेमा स्मॉर्ट हिट झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलेय, मराठी सिनेमा पावखिंड हा स्मॉर्ट हिट झाला. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाची यशस्वी घोडदौड कायम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

१८ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पावनखिंड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यात १२.१७ कोटींची कमाई केली. तर आठड्याच्या शेवटी शुक्रवारी १.०२ कोटी शनिवारी १.५५ तर रविवारी १.९७ कोटींची कमाई केली. एकूण मिळून पावनखिंडने बॉक्स ऑफिसवर १६.७१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूतपूर्व कारकिर्दीतील त्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या शिवराज अष्टका’तील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. सिनेमात अभिनेते चिन्मय मांडलेकर,अजय पूरकर, अंकित मोहन, शिवराज वायचळ, मृणाल कुलकर्णी, प्राजक्त माळी, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी,माधवी निमकर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.


हेही वाचा –  सुपरस्टार धनुषच्या Maaranचा ट्रेलर रिलीज, निभावणार पत्रकाराची भूमिका