पवार म्हणजे धर्म नाहीत… केतकी चितळेने मांडली स्वत:ची बाजू

मी केवळ एक फेसबुक पोस्ट कॉपी पेस्ट करून शेअर केली होती. त्यामुळे मला इतके दिवस अटक करण्यात आली

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्टर शेअर केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या विरोधात राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हे दाखल झाले होते. मागील काही दिवसांपूर्वी केतकीला जामीन मंजूर झाला. तुरूंगातून बाहेर आल्यावर केतकीने एका माध्यमासी संवाद साधताना आपलं मत व्यक्त केलं आहे.केतकी म्हणाली की अटकेच्या काळात तुरूंगात असताना तिच्यावर अनेत अत्याचार करण्यात आले.

तसेच ती म्हणाली की, “मी केवळ एक फेसबुक पोस्ट कॉपी पेस्ट करून शेअर केली होती. त्यामुळे मला इतके दिवस अटक करण्यात आली, ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही वेळाने पोलीस माझ्या घरी मला अटक करण्यासाठी हजर झाले. त्यांनी मला अटक केलं. या सर्व गोंधळात २० ते २५ जण माझी छेड काढली, माझ्यावर हल्ला केला, मला मारलं, माझ्या अंगावर अंडी फेकली, माझ्या अंगावर शाई फेकली. फक्त माझ्यावरचं नाही तर त्यांनी माझ्यासोबत असणाऱ्या पोलिसांवरही हल्ला केला.”

केतकी पुढे म्हणाली की, “मी सध्या एका शेअर केलेल्या पोस्टमुळे २२ तक्रारींविरोधात लढा देत आहे. यांपैकी मला आता फक्त एका प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे, मात्र अजून २१ प्रकरणं बाकी आहेत. मी भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत पोस्ट केली होती. ते लोकांनी एखाद्या वेगळ्या अर्थाने घेतलं तर मी त्यात काहीही करु शकत नाही. मी केवळ काही यमक जुळवून केलेल्या पोस्टमुळे तुरुंगात होते. पवार म्हणजे धर्म नाहीत,” असं केतकीने म्हटलं आहे.

केतकी चितळेवर सार्वजनिक दुष्प्रचार , बदनामी आणि विविध गटांमधील शत्रुत्व या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान केतकीला न्यायालयाने इतर प्रकरणांमध्ये अटकेपासून संरक्षण दिलंय. महाराषट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये केतकीविरोधात गुन्हे दाखल झाले होते, १४ मे रोजी केतकीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते, तसेच २४ जून रोजी तिला जामीन मंजूर झाला.


हेही वाचा :समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा