घरमनोरंजनतो काळ खूप सुंदर होता, अशा भोसलेंनी दिला लता दीदींच्या सुरेल आठवणींना...

तो काळ खूप सुंदर होता, अशा भोसलेंनी दिला लता दीदींच्या सुरेल आठवणींना उजाळा

Subscribe

लता मंगेशकर यांच्या बद्दल एका कार्यक्रमात बोलताना, त्यांच्या आठवणींना उजाळा देत असताना आशा भोसले भावुक झाल्या, म्हणाल्या अजूनही वाटत की दीदींचा मला कॉल येईल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (lata mangeshkar) यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रामध्ये कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण देशच हळहळला होता. लता दीदींच्या जाण्याने त्यांच्या परिवाराचं सुद्धा फार मोठं नुकसान झालं आहे. लता दीदींच्या बहीण अशा भोसले या लता दीदींबद्दल नेहमीच विविध कार्यक्रमांमध्ये बोलत असतात. दीदींबद्दल बोलताना आशा भोसले (asha bhosle) नेहमेच भावुक झालेल्या सुद्धा दिसतात. लता दीदींच्या निधनानंतर त्यांना देशातल्या प्रत्येक ठिकाणाहून, स्तरातून श्रांद्धांजली अर्पण करण्यात आली होती. ‘नाम रह जाएगा’ (naam reh jayegaa) हा कार्यक्रम अलीकडेच लता दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सुरु झाला आहे. या कार्यक्रमाच्या आगामी भागात अशा भोसले बहीण लता मंगेशकर (lata mageshkar) यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसणार आहेत. याच कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा भोसले यांनी लता दीदींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला आहे.

लता दीदींच्या आठवणींना उजाळा देत आशा भोसले म्हणाल्या, ” लता दीदींनी कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही तुमच्या आई – वडिलांचे पाय धुवून ते पाणी प्यायलं तर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी व्हाल. तेव्हा त्यांनी मला पाणी आणायला संगितले, आणि एक ताट घेऊन आई – वडिलांचे पाय धुतले आणि आम्हा सर्व भावंडाना ते पाणी प्यायला सांगितले. मला वाटत की आज आम्ही यामुळेच यशस्वी आहोत. ” अशा भोसले पुढे असंही म्हणाल्या, ” माझ्या बहिणीने कधीच कोणती गोष्ट मागितली नाही. एक सर्वसाधारण आयुष्य त्या जगात होत्या आणि सुरुवातीला दीदी महिन्याला ८० रुपये कमवायच्या. आम्ही घरात ५ माणसं होतो आणि तेवढ्याच पैशात आम्हाला आमचा महिन्याचा घर खर्च चालवावा लागत होता. काही वेळा आमचे बरेच नातेवाई सुद्धा घरी येत असंत त्यावेळी दीदी (lata mangeshkar) काहीच बोलायच्या नाहीत. एखादी गोष्ट सर्वांसोबत वाटण्यात जास्त आनंद मिळत होता. खूपदा अशी वेळ सुद्धा यायची की आम्ही २ आण्यांचे कुरमुरे विकत घ्यायचो आणि ते चहासोबत खाऊन झोपून जायचो. पण असं असतानाही आम्हला कोणालाच कधी कोणती तक्रार नव्हती. तो एक काळ खूप सुंदर होता.

- Advertisement -

दीदी आपल्यात नाही यावर अजूनही विश्वास बसत नाही आहे.” असंही अशा भोसले(asha bhosle) म्हणाल्या. आजही मला वाटतं की, दीदीचा कॉल येईल आणि त्या म्हणतील अशा तू कशी आहेस? लता दीदींच्या काही आठवणी सांगत अशा भोसले सुद्धा भावुक झाल्या. ”नाम रह जाएगा” (naam reh jayegaa) या कार्क्रमात सोनू निगम(sonu nigam), कुमार शानू, अमित कुमार यांसारख्या १८ गायकांचा सहभाग असणार आहे.

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -