Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन PearlVPuriCase:दिव्‍या खोसला कुमारने पीडितेची माहिती केली उघड!

PearlVPuriCase:दिव्‍या खोसला कुमारने पीडितेची माहिती केली उघड!

दिव्याने पीडितेची माहिती सर्वांसमोर प्रकट केल्याने नेटकरी चकित झाले आहे. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत

Related Story

- Advertisement -

नागिन ३’ (‘Nagin 3) या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri) काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को (POSCO) कायद्याअंर्तगत अटक करण्यात आली . ४ जून रोजी अभिनेता पर्ल व्ही पुरीला IPC कलम CR IPC ३७६AB,R\w पोस्को कायदा ४,८,१२,१९ आणि २१ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. सध्या पर्ल न्यायालयीन कोठडीत आहे. पर्लच्या अटकेनंतर अनेक टीव्ही सेलिब्रिटी पर्लला पाठिंबा देण्याकरिता सोशल मीडियावर उतरले आहे. टी सिरिजचे मालिक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांची पत्नी तसेच अभिनेत्री -डायरेक्टर दिव्या खोसला कुमारने (Divya Khosla Kumar) आता पर्लला सपोर्ट केला आहे आणि अशातच स्वत: वर संकट ओढवून घेतलं आहे. दिव्याने सोशल मीडियावर पीडितेची आणि तिच्या आई वडिलांची ओळख सर्वांसमोर उघड केली आहे. आणि कायद्यानुसार एखाद्या बलात्कार पीडितेची आणि तिझ्याशी निगडीत असणारी कोणतीही माहिती सर्वांसमोर आणणे हा गुन्हा आहे. आणि अशी चूक दिव्याने केली आहे. इकेच नाही तर दिव्याने एक फोटो सुद्धा शेअर केला आहे. यामुळे दिव्या चांगलीच अडचणीत सापडली आहे.

काय लिहलं आहे पोस्ट मध्ये-

दिव्याने काही दिवसांपूर्वी पर्ल सोबत एका म्युझिक व्हिडिओ मध्ये एकत्र काम केलं होतं. दोघांची जोडी लोकांना खूप आवडली होती. आता पर्लला पाठिंबा देत दिव्याने लिहलं आहे की,” अत्यंत लज्जास्पद आणि आश्चर्यकारक घटना आहे. चला त्यांची ओळख करुन देते. ही अभिनेत्री आहे आणि सोबत हा व्यक्ती आहे ज्याने पर्ल वर 5 वर्षाच्या मुलीवर छेडछाड केली असल्याचे आरोप लावले आहेत . या दोघांची कोर्टात मुलीच्या कस्टडी संदर्भात केस सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून मुलगी आपल्या वडिलांसोबत राहत आहे कारण त्याने पत्नीवर आरोप लावले आहेत की मुलीला सेट वर घेऊन गेली होती जिथे पर्लने त्या मुलीसोबत गैरव्यवहार केला. मुलगी आईसोबत सुरक्षित नाहीये.माला असं वाटत आहे या माणसाला फिल्मफेयरचा बेस्ट स्क्रीनप्ले अवॉर्ड द्यायला हवा. आत पोलिसांनी पर्लला अटक केली आहे. मला जाणून घ्यायचं आहे की 2019 मध्ये जेव्हा एफआयआरची नोंद झाली होती त्यावळेस अटक का नाही केली . एफआयआर मध्ये लिहलं आहे की मुलीसोबत जेव्हा छेडछाड झाली तेव्हा ती आई सोबत होती. पर्ल पुर्णपणे निर्दोष आहे. ” असे भली मोठी पोस्ट लिहून दिव्याने पीडितेची माहिती समोर आणली आहे.

- Advertisement -

दिव्याने पीडितेची माहिती सर्वांसमोर प्रकट केल्याने नेटकरी चकित झाले आहे. अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.कायद्यानुसार एखाद्या बलात्कार पीडितेची आणि तिझ्याशी निगडीत असणारी कोणतीही माहिती सर्वांसमोर प्रकट करणे हा दंडनीय अपराध आहे. असे केल्यास त्या व्यक्तीला आयपीसी कलम 228A अंतरगट गुन्हा दाखल होऊ शकतो तसेच व्यक्तिला 2 वर्षाची अटक होऊ शकते.


हे हि वाचा – ‘ये जवानी है दिवानी’फेम अभिनेत्री एवलिन शर्मा अडकली विवाहबंधनात

- Advertisement -