Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन PearlVPuriCase:निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर रंगली कॅट फाईट

PearlVPuriCase:निया-देवोलिनामध्ये ट्विटरवर रंगली कॅट फाईट

पर्लच्या अटकेनंतर अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवत #i stand with pearl v puri हा टॅग देत त्याला सपोर्ट करत आहेत.

Related Story

- Advertisement -

नागिन ३’ (‘Nagin 3) या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता पर्ल व्ही पुरीला (Pearl V Puri) काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोस्को (POSCO) कायद्याअंर्तगत अटक करण्यात आली आहे. अशातच अनेक टेलिव्हीजन स्टारने पर्लला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या प्रकरणावरुन अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आणि निया शर्मा (Nia Sharma) यांच्यात चांगलीच खडाजंगी  रंगली आहे. दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरु झालं आहे. एकिकडे नियानं पर्लला सपोर्ट करत त्याची पाठराखण केली आहे. तर दुसरीकडे देवोलिना मात्र पर्लला पाठिंबा देणार्‍या कलाकारांवर टीकेची झोड उठवली आहे. केलेल्या कर्माची फळ इथेच भोगावी लागतात असा टोला लगावत सर्व सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. सध्या सोशल मिडियवर दोन्ही अभिनेत्रींची कॅट फाईटची जोरदार चर्चा रंगत आहे

- Advertisement -

देवोलिनाने एक ट्विट करत लिहलं आहे की,”तुमचा सोशल मीडियावरील आवाज त्याला कुठल्याही प्रकराची मदत करु शकणार नाही. तुम्ही एका लहान मुलीवर आरोप करताय तुम्हाला तुमच्या कर्माची फळ भोगावीच लागतील. किती विचित्र लोक आहात तुम्ही सगळे विरोध करायचाच असेल तर आंदोलन करा, उपोषण करा पण इथं सोशल मीडियावर अशी दुर्गंधी पसरवू नका.”यावर निया शर्माने सडेतोडपणे उत्तर देत म्हटलं आहे की,”ताईला कोणीतरी सांगा, उपोषण किंवा कँडल मार्च काढण्यासाठी सध्या परवानगी मिळणार नाही. देशात सध्या कोरोनाचं संक्रमण सुरु आहे. शिवाय ताईला डान्स रिल शेअर करण्यापूर्वी सराव करण्याची गरज आहे. सध्या तू त्याच्यावरच लक्ष केंद्रित कर.” नियाच्या या रीप्लाय नंतर देवोलिनाचा पारा चढला आणि इथूनच दोघांची कॅट फाईट सुरू झाली.

Didi ko koi bata do dharna and candle march nahi kar sakte pandemic hai abhi bhi.

- Advertisement -

Also Didi needs to practice her dance before she makes those pathetic dance reels thinking she’s nailing them.— NIA SHARMA (@Theniasharma) June 7, 2021

“मी केलेले सर्व ट्विट्स त्या सात वर्षांच्या मुलीला ट्रोल करणाऱ्यांविरोधात होते. जे लोकं त्या लहान मुलीला गोल्ड डिगर म्हणत आहेत. तुला मिरची का लागली? तुला खरंच या प्रकरणातलं काही माहित आहे की उगाचच अर्धवट माहितीच्या आधारावर ट्विट करते आहेत.” अशा आशयाचे ट्विट करत देवोलिनाने नियाला चांगलेच झापले आहे.

पर्लच्या अटकेनंतर अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवत #i stand with pearl v puri हा टॅग देत त्याला सपोर्ट करत आहेत.


हे हि वाचा – ‘या’अभिनेत्याकडून विक्की-कतरीनाचे नाते उघड, फॅन्ससाठी गुड न्यूज

- Advertisement -