Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन आराध्यामध्ये लोकं ऐश्वर्याचे सौंदर्य शोधतात, जया बच्चन यांची नातीसाठीची...

आराध्यामध्ये लोकं ऐश्वर्याचे सौंदर्य शोधतात, जया बच्चन यांची नातीसाठीची कमेंट चर्चेत

ऐश्वर्या जितकी सुंदर आहे, तितकीच समजूतदारही आहे. ऐश्वर्या एक जबाबदार आई आहे आणि आराध्याची कित्येक काम तिला स्वतःला करायला आवडतात

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड मधील अत्याधिक नावाजलेल्या घराण्यामध्ये बच्चन कुटूबियांचा सुद्धा समावेश होतो. चित्रपटसृष्टीतील झगमगाटीच्या जगात वावर असून सुद्धा आपल्या मूळ मातीशी आणि संकृतीशी अत्यंत घट्ट जवळीक बच्चन कुटुंबिय साधतांना दिसतात. याचे उदाहरण दयायचे झाल्यास एका अवॉर्ड सोहळ्या दरम्यान ऐश्वर्या अवॉर्ड घेण्यासाठी मंचावर जाते आणि तिला महानयक अमिताभ बच्चन म्हणजेच तिचे सासरे यांकडून अवॉर्ड देण्यात येतो. अवॉर्ड स्वीकारण्याआगोदर मंचावर उपस्थित असलेल्या सासर्‍यांच्या पाया पडते आणि अवॉर्ड स्वीकारते.आता बच्चन घराण्यातील आगामी पिढी म्हणजेच आराध्या बच्चन लाइम लाईट मध्ये जास्त वावरत नसली तरीही तिच्या चर्चा सगळीकडे रंगत असतांना दिसतात. आराध्या बाबत बोलतांना जया बच्चन यांनी म्हंटलं आहे की.”आराध्याचा चेहरा आई आणि वडील दोघांशीही मिळतो जुळतो , पण लोक आराध्यामध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्याचा शोध घेण्याचा अधिक प्रयत्न करतात. तसेच ऐश्वर्या जितकी सुंदर आहे, तितकीच समजूतदारही आहे. ऐश्वर्या एक जबाबदार आई आहे आणि आराध्याची कित्येक काम तिला स्वतःला करायला आवडतात’ असं स्पष्ट मत जया यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

बच्चन परिवरातील सदस्यांनी आपलं स्वतंत्र नाव बॉलिवूड मध्ये कामावलं आहे अभिनेत्री जया आणि अमिताभ बच्चन यांनी एक संपूर्ण काळ चित्रपटसृष्टी मध्ये गाजवला आहे. सध्याच्या घडीला अमिताभ बच्चन यांना महानयक म्हणून संबोधलं जातं. जया बच्चन सध्या  बॉलिवूडच्या गदारोळा पासून दूर राहणे पसंत करतात.


हे हि वाचा – शूटींगसाठी मुंबई सोडली, गोव्यातही आता लॉकडाऊन अन् हिंदी मालिकांचे शूटिंग पुन्हा ठप्प

- Advertisement -