‘त्या’ फोटोमुळे नेटकऱ्यांनी बेबोला सुनावले; नेटकरी म्हणाले

करीना कपूर सध्या योगासाधनेच्या फोटोमुळे आली चर्चेत

People Show Kareena Kapoor How Real Pregnant Women Don't Do Yoga But Work Till They Give Birth
'त्या' फोटोमुळे नेटकऱ्यांनी बेबोला सुनावले; नेटकरी म्हणाले

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमी तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते. लवकरच करीना दुसऱ्यांदा आई होणार आहे. माहितीनुसार तिला फेब्रुवारी महिन्यातील तारीख देण्यात आली आहे. गर्भवती असून करीना अनेक जाहिरातीसाठी काम करताना दिसत आहे. मध्यंतरी ती बहीण करिश्मा कपूरसोबत फोटोशूट करताना दिसली होती. नुकतेच करीनाने योगा करतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामुळे करीना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

या फोटोंमध्ये करीना योगा करताना आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना तिने अनेक प्रेरणादायी संदेशही शेअर केले आहेत. पण नेटकऱ्यांनी करीनाच्या या फोटोंमुळे तिला चांगलंच धारेवर धरले आहे. काही नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे. करीना सध्या योगा करतानाचे सतत फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे नेटकऱ्यांना तिला खऱ्या आयुष्यातील गर्भवती महिला कशा योगा करतात आणि अशा परिस्थितीत कशी काम करतात हे सांगितले आहे.

पाहा नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर काही महिन्यांपूर्वीच करीनाने आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्डा’ शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटातून पुन्हा एकदा ती आमिर खानसोबत दिसणार आहे. टॉम हॅन्क्स यांच्या फिल्म फॉरेस्ट गंपचा हा हिंदी रिमेक आहे. या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – सैफ-करीनाच्या दुसऱ्या मुलाच्या नावावर स्वतः बेबोने केला मोठा खुलासा