घरमनोरंजनअमला पॉलच्या न्यूड सीनवर प्रिया राजेश्वरींचा आक्षेप

अमला पॉलच्या न्यूड सीनवर प्रिया राजेश्वरींचा आक्षेप

Subscribe

'आदाई' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अमला पॉलचा न्यूड सीन दाखवण्यात आला आहे. या सीनवरुन अमलावर काही लोकांनी टीका केली आहे.

‘आदाई’ या तमिळ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री अमला पॉलचा न्यूड सीन दाखवण्यात आला आहे. त्यामुळे काही लोक अमला पॉलवर टीका करत आहेत. राजकीय नेत्या प्रिया राजेश्वरी यांनी तर अमला पॉल विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे अमला पॉल अडचणीत आली असून अमलाच्या त्या दृश्यावर कात्री लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत सेन्सॉर बोर्डकडून अधिकृत माहिती आलेली नाही. सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाला ‘अ’ प्रमाणपत्र दिले आहे.

‘अशा दृश्यांमुळे बलात्काराच्या घटना घडतात’

चित्रपट हे एक माध्यम असते. त्यामुळे चित्रपटातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या असतात. मात्र, तो चित्रपट न पाहताच न्यूड सीन्समुळे त्याच्यावर टीका केली जाते. असे अनेकदा घडले आहे. आता ‘आदाई’ या तमिळ चित्रपटाबाबतही तसेच काहीसे घडताना दिसत आहे. प्रिया राजेश्वरी यांनी केलेल्या तक्रारीत त्यांनी अमलाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चित्रपटातून न्यूडीटी पसरवण्यात आली असून अशा दृश्यांमुळे तरुणांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊन बलात्कारासारख्या घटना घडतात, असे प्रिया राजेश्वरी म्हणाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – video : ‘या’ खास महिलेसोबत केला सलमानने रोमँटिक गाण्यावर डान्स

‘न्यूड दृश्याचे चित्रीकरण करताना सेटवर १५ जण होते’

दरम्यान, या दृश्याच्या चित्रीकरणावेळी सेटवर फक्त १५ जण उपस्थित होते, अशी माहिती स्वत: अमलाने एका मुलाखतीत दिली आहे. या चित्रीकरणासाठी मनावर बरेच दडपण होते. त्या दृश्याच्या चित्रीकरणासाठी वेगळा सेट तयार करण्यात आला होता. मात्र या दृश्याच्या चित्रीकरणावेळी फक्त १५ जण सेटवर उपस्थित होते. ते सर्व विश्वासाची मानसे होती. त्यामुळे या बोल्ड सीनचे चित्रीकरण आपल्याला करता आल्याचे अमनाने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -