महेश मांजरेकर यांच्या विरोधात FIR होणार ? ७ फेब्रुवारीला विशेष पॉक्सो कोर्टाचा आदेश अपेक्षित

भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टात आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली होती.

petition against Mahesh Manjrekar nay varan bhat loncha kon koncha movie Special Pokso court result on February 7
महेश मांजरेकरांविरोधातील याचिकेवर ७ फेब्रुवारीला विशेष पोक्सो कोर्टात निकाल

‘नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या सिनेमातील आक्षेपार्ह सीन्समुळे दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली असून ७ फेब्रुवारीला महेश मांजरेकरांविरोधात एफआयआर होणार की नाही? याचे निर्देश देण्यात येणार आहेत.  ‘नाय वरण भात लोणचा कोन नाय कोणचा’ या सिनेमात अल्पवयीन मुलांची लैंगिक मानसिकता बीभत्सपणे दाखवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे सीमा देशपांडे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टात आयपीसी कलम 156 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीची मागणी केली होती.

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जिवनावर आधारीत नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा या सिनेमात दाखवण्यात आलेल्या सीन्सविषयी अनेक टीका करण्यात आल्या. महिला आयोगाच्या तक्रारीनंतर सीमा देशपांडे यांनी महेश मांजरेकरांविरोधात माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या तक्रारीची दखल न घेतल्याने त्यांनी अखेर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयातील पोक्सो कोर्टात धाव घेऊन मांजरेकरांविरोधात याचिका दाखल केली.

दिग्दर्शक महेश मांजरेकरांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रीया दिली, एका वेबसाइटशी बोलताना ते म्हणाले, आज प्रत्येकाला प्रत्येक सिनेमातील कोणत्या ना कोणत्या गोष्टीबाबत आक्षेप असतो. त्यामुळे आक्षेप घेणाऱ्या सर्वांचीच आम्ही पूर्तता करू शकत नाही. कायदेशीर गोष्टींना आता कायदेशररित्याच प्रतिक्रीया देऊ. कारण आम्ही सिनेमा बनवला आणि तो सेंट्रेल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला सबमिट केला त्यांनी सिनेमाला ए सर्टिफिकेट दिले. आमचा सिनेमा हा केवळ 18 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी आहे हे आम्हाला माहिती असल्याने आम्ही ते मान्य केले आहे.


हेही वाचा –  नाय वरण भात लोन्चा सिनेमाच्या वादावरुन Mahesh Manjrekar यांच्या विरोधात विशेष पोक्सो कोर्टात तक्रार