घरमनोरंजनमिस्ट्री गर्लसोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; काय आहे दोघांमध्ये नातं?

मिस्ट्री गर्लसोबत अक्षय कुमारच्या मुलाचे फोटो व्हायरल; काय आहे दोघांमध्ये नातं?

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सतत विविध कारणांमुळे चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे तर कधी त्याच्या खासगी आयुष्यामुळे अक्षयला दोन मुलं आहेत. त्याच्या मुलाचं नाव आरव आहे आणि मुलीचं नाव नितारा आहे. अक्षय त्याच्या दोन्ही मुलांना मीडियापासून दूर ठेवतो. मात्र, हल्ली त्याचा मुलगा आरव मीडियासमोर अनेकदा स्पॉट होतो. अशातच आरव एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या आरवचे एका मुलीसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आरव बरोबर ही मिस्ट्री गर्ल नक्की कोण? असा अनेकांना प्रश्न देखील पडला आहे. अनेकजण ती आरवची मैत्रिण किंवा गर्ल फ्रेंड असेल असं देखील म्हणू लागले आहेत.

सोशल मीडियावर आरवसोबत दिसणाऱ्या या मिस्ट्री गर्लचं नाव नाओमिका असं आहे. परंतु ही आरवची मैत्रिण किंवा गर्ल फ्रेंड नसून मावस बहीण आहे. ही मुलगी ट्विंकल खन्नाची धाकटी बहीण रिंकी खन्नाची मुलगी आहे. आरव आणि नाओमिकाचे अनेक फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomika Saran (@naomika14)

- Advertisement -

आरव कुमारच्या या बहीणीचे नाव नाओमिका सरन असून ती आता ती 18 वर्षांची आहे. आरव सध्या 20 वर्षाचा आहे. अनेकदा त्याचे आणि नाओमिकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अक्षय केळकर ठरला “बिग बॉस मराठी 4″चा महाविजेता!

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -