Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनPM Modi : 'आर्टिकल 370' चित्रपटाचे पीएम मोदींकडून कौतुक

PM Modi : ‘आर्टिकल 370’ चित्रपटाचे पीएम मोदींकडून कौतुक

Subscribe

सध्या बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट रिलिज होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार आहे. अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला आर्टिकल 370 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यामी गुप्तहेर खात्यातील एक अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात केला. त्यानंतर यामीने त्यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

जम्मूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी ऐकलंय की या आठवड्यात ‘आर्टिकल 370’ वर आधारित एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट कसा आहे याबद्दल मला माहीत नाही. पण मी या चित्रपटाबद्दल नुकतंच ऐकलंय. ही चांगली गोष्ट आहे, कारण लोकांना योग्य माहिती मिळण्यास मदत होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

यामीने व्यक्त केला आनंद

यामीने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तिचा आनंदही व्यक्त केला आहे. यासोबतच तिने म्हटले आहे की, “आमची टीम तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो” असे म्हटले आहे.

चित्रपट निर्मात्यांकडून प्रेक्षकांसाठी बंपर ऑफर

‘आर्टिकल 370’च्या निर्मात्यांनी रिलीजच्या पहिल्याच दिवशी खास ऑफर लाँच केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आर्टिकल 370’मध्ये यामी गौतम ही एनआयए अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपट

‘आर्टिकल 370’ हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात यामीची मुख्य भूमिका आहे. यामीच्या या चित्रपटात काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची कथा दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित होणार नाही, याबाबत दिग्दर्शक आदित्य धर यांना विचारलं असता ते म्हणाले, “आम्ही हा चित्रपट काश्मीरमध्ये प्रदर्शित करण्याचा विचार केला होता. पण आता आम्ही लवकरच पालक होणार आहोत. त्यामुळे आम्ही चित्रपट फक्त जवळच्या ठिकाणी प्रदर्शित करत आहोत कारण यामी जास्त प्रवास करू शकत नाही.”


हेही वाचा : Virat – Anushka : विराट- अनुष्काला पुत्ररत्न, बाळाचं नाव ठेवलं ‘अकाय’