‘मोदी’ साकारणाऱ्या विवेकचं जोरदार ‘ट्रोलिंग’

पंतप्रधान मोदींच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकचं नाव ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं आहे.

PM Narendra Modi biopic: Vivek Oberoi gets trolled

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्याचं पोस्टर समोर आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असं या बायोपिकचं नाव असून, अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे. मात्र, पोस्टरवरील विवेकचा लूक चटकन ओळखू येण्यासारखा नाहीये. दरम्यान, आजच्या इंटरनेटच्या युगात बॉलीवूड किंवा राजकारणातील एखादी नवी गोष्ट समोर आली आणि इंटरनेटवर संबंधित नेत्याचं किंवा अभिनेत्याचं ट्रोलिंग झालं नाही, असं होणं अशक्य. मोदींची भूमिका साकारणारा विवेक ओबेरॉयही सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.  तो साकारत असलेली मोदींची भूमिका, बायोपिकच्या पोस्टरवरील त्याचा मोदी लूक, या मुद्यांवरुन नेटिझन्सनी त्याला इंटरनेटवर जबरजस्त ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर जगभरातील लोकांनी ‘पीएम नरेंद्र मोदी’  या येऊ घातलेल्या बायोपिकवर आणि विवेक ओबेरॉयच्या लूकवर एका हून एक भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. पाहुया, याचीच काही गमतीशीर उदाहरणं…

 


सोमवारी (काल) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या पोस्टरचं अनावरण करण्यात आलं.  ‘देशभक्ती ही मेरी शक्ती है’ अशी चित्रपटाची टॅगलाईन आहे. ‘लिजंड ग्लोबल स्टुडिओ’ प्रस्तृत या चित्रपटाच्या ग्रॅण्ड पोस्टरच्या अनावरणाचा कार्यक्रम गरवारे क्लब हाऊस वानखेडे स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. हा चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटातून राजयोगी व्यक्तिमत्वाच्या आणि वैश्विक नेत्याचे जीवन जगासमोर येणार आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.