PM Modi: पंतप्रधान मोदींनी केली लता दिदींच्या तब्येतीची चौकशी

लता दिदींच्या (Lata Mangeshkar ) तब्येतीची थेट पंतप्रधान मोदींनी (PM Modi )  दखल घेत लता दिदींच्या तब्येतीची फोन करुन चौकशी केली आहे. पंतप्रधानांनी लता दिदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

PM narendra Modi spoke to Lata mangeshkar and inquired about her health
PM Modi: पंतप्रधान मोदींनी केली लता दिदींच्या तब्येतीची चौकशी

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाच्या विळख्यात आजवर अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी आणि नेत्यांची नावे आली आहे. यात आता गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे देखील नाव आले आहे. लता मंगेशकर यांना शनिवारी कोरोनाची लागण (Lata Mangeshkar corona Positive)  झाल्याने त्यांना उपचारांसाठी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लता दिदींच्या तब्येतीची थेट पंतप्रधान मोदींनी (PM Modi )  दखल घेत लता दिदींच्या तब्येतीची फोन करुन चौकशी केली आहे. पंतप्रधानांनी लता दिदींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि बिहारचे मुख्यमंत्र्यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांच्या तब्येतीची देखील पंतप्रधानांनी विचारपूस केली. त्याचवेळी त्यांनी लता दिदींच्या प्रकृतीची देखील फोन करुन विचारपूस केली.

गान कोकिळा लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी शनिवारी पॉझिटीव्ह आली. त्यांच्या फुफ्फुसात काही प्रमाणात इन्फेक्शन आढळले असून त्यांना निमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना त्वरित मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या आयसीयू विभागात दाखल करण्यात आले. 10 जानेवारी रोजी लता दिदींना श्वास घेण्यास त्रास झाला होता. मात्र आत त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधानांनी देखील लता दिदींच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे.

सोमवारी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरू आहेत. नीतीश कुमार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली होती. त्याचप्रमाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना देखील कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री बोम्मई यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. बोम्मई यांची प्रकृत सध्या स्थिर आहे.


हेही वाचा – Corona Virus: लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल