घरमनोरंजनMunawar Faruqui : 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यावर पोलिसांची...

Munawar Faruqui : ‘बिग बॉस 17’ चा विजेता मुनव्वर फारुकीच्या चाहत्यावर पोलिसांची कारवाई, काय आहे प्रकरण?

Subscribe

मुंबई : बिग बॉस 17 च्या ट्रॉफीवर स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने नाव कोरले आहे. मुंबईतील डोंगरी या परिसरात लहानाचा मोठा झालेला मुनव्वर फारुकी ही बिग बॉसच्या 17 व्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री डोंगरी परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तर बिग बॉसमधून विजयी होऊन मुनव्वर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. 29 जानेवारी) बिग बॉसची ट्रॉफी घेऊन डोंगरी परिसरात दाखल झाला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी, त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. ज्याचे असंख्य फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. परंतु, यामुळे मुनव्वरचा एक चाहता मोठ्या अडचणीत सापडला आहे. मुनव्वर फारुकीचा चाहता असलेला अरबाज युसुफ खान याच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. (Police action on ‘Bigg Boss 17’ winner Munawar Faruqui’s fan)

हेही वाचा… मिथिला पालकराचा रॉयल लूक चर्चेत

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, इतरांप्रमाणेच मुनव्वर फारुकीचा चाहता अरबाज युसुफ खान हा डोंगरीमध्ये आला होता. परंतु, यावेळी त्याने गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवले, पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी अरबाजचा हा ड्रोन ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी अरबाज याच्यावर ड्रोन उडवल्याप्रकरणी एफआरआय दाखल केल्याची माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. परंतु, अरबाज खान याने याबाबतची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. ज्यामुळे मुनव्वरच्या चाहत्यावर पोलिसांकडूनही कारवाई करण्यात आली.

रविवारी (ता. 28 जानेवारी) मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये बिग बॉस 17 चा अंतिम सोहळा पार पडला. यंदाच्या पर्वात स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी आणि हिंदी मालिकेतील अभिनेता अभिषेत कुमार हे दोघे अंतिम फेरीत आले होते. परंतु, अभिषेकपेक्षा मुनव्वरच्या चाहत्यांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यामुळे मुनव्वरला विजयी होता आले. ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर मुनव्वरला ट्रॉफीबरोबरच 50 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. याबरोबरच त्याला ह्युंडाई कंपनीची क्रेटा गाडीही मिळाली आहे. परंतु, यामुळे अनेक हिंदूंच्या भावना देखील दुखावल्याचे बोलले जात आहे. कारण काही वर्षांपूर्वी मुनव्वर याने हिंदू धर्मांवर टीका करत प्रभू श्रीराम आणि सीतेवर विनोद केले होते. ज्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -