घरमनोरंजन'पुष्पराज' अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत काम केल्याने FIR दाखल

‘पुष्पराज’ अडचणीत, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीत काम केल्याने FIR दाखल

Subscribe

साऊथ सिनेमाचं जाळं संपूर्ण देशात वाढत चाललं आहे. सिनेमातील कालाकारांची स्टाईल, फॅशन, डायलॉग, अॅक्शन सीन्स पाहून प्रेक्षकवर्ग आकर्षित होतो. काही काळापूर्वी आलेला ‘पुष्पा’ हा सिनेमा देखील चांगलाच गाजला. अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) लोकप्रियतेमध्ये या सिनेमामुळे वाढ झाली. दरम्यान प्रसिद्धी असो किंवा ट्रोलिंग कलाकारांना दोन्ही गोष्टी सहन कराव्या लागतात. याचाच प्रत्यय अभिनेता अल्लु अर्जुनला आला आहे. अल्लू विरोधात एका समाजिक कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. त्यांचा दावा आहे की, एका शैक्षणिक संस्थेच्या विषेश जाहिरातीत दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती अल्लूने दिली आहे. (Police Complaint Filed Against Pushpa Star Allu Arjun)

नेमकं काय घडलं

माहितीनुसार समाजिक कार्यकर्ते कोठा उपेंद्र रेड्डी यांनी अंबरपेठ पोलिस ठाण्यात अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल केली आहे. अल्लूने जाहिरातीत आणि श्री चैतन्य शैक्षणिक संस्थेविरुद्ध खोटी माहिती दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. आता अल्लूवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

- Advertisement -

नेमंक जाहिरातीत काय ?

6 जून रोजी अल्लू  अर्जुनने IIT आणि NIT च्या रॅंकर्सची माहिती देत श्री चेतन्य शैक्षणिक संस्थेचं प्रमोशन केलं होतं. यामध्ये चुकीची माहिती देण्यात आल्याने आता अल्लू अर्जुनला अडचणींचा सामना करावा लागतोय.  यापूर्वी अल्लूला फूड डिलिव्हरी अॅपच्या मार्केटिंगसाठी ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. एवढेच नाही तर सरकारी ट्रान्झिट सर्व्हिसेसची चुकीची माहिती देऊन बाईक अॅपची जाहिरात केल्याप्रकरणी अल्लूला ताकीदही देण्यात आली होती. मात्र अल्लूने अद्याप यावर जाहीरपणे भाष्य करण टाळलं आहे.

- Advertisement -

हे ही वाचा –  ‘ब्रह्मास्त्र’मधील नंदी अस्त्रधारी नागार्जुनचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -