घरमनोरंजनआयफोनवर चित्रित झालेल्या 'पाँडीचेरी' चित्रपटाचा ट्रेलर आऊट

आयफोनवर चित्रित झालेल्या ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट

Subscribe

या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आयफोनवर चित्रित झालेला पहिला भारतातील मराठी चित्रपट ‘पाँडीचेरी’ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ‘पाँडीचेरी’चे निसर्गसौंदर्य, अथांग समुद्रकिनारे, रंगीबेरंगी फ़्रेंच धाटणीची घरे आणि या शहरात निर्माण होणारे अनोखे नातेसंबंध या टीझरमध्ये पाहायला मिळतेय. ”पाँडीचेरी’बाबतची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात वाढत असतानाच आता चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

‘गुलाबजाम’ सारख्या दर्जेदार चित्रपटाची मेजवानी दिल्यानंतर आता सचिन कुंडलकर ‘पाँडीचेरी’ची सैर घडवणार आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, नीना कुळकर्णी, महेश मांजरेकर, गौरव घाटणेकर आणि तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर मिलिंद जोग यांनी छायाचित्रणकाराची भूमिका निभावत निसर्गरम्य ”पाँडीचेरी’ आणि तिथे निर्माण होणारे भावनिक नातेसंबंध टिपले आहेत.

- Advertisement -

निसर्गाची मुक्तपणे उधळण झालेल्या ‘पाँडीचेरी’ चित्रपटाचा ट्रेलर आऊट’ शहरात घडणारी ही कथा आहे. सई, वैभव आणि अमृता यांच्या आगळ्यावेगळ्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असून ट्रेलर पाहता हा चित्रपट लव्ह ट्रॅन्गल असल्याचे जरी दिसत असले तरी नात्याची आणि कुटुंबाची नवीन व्याख्या ‘पाँडीचेरी’च्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये प्रत्येकाच्या आयुष्याचा एक वेगळा प्रवास दिसत आहे. हा प्रवास त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर घेऊन जातो आणि त्यांच्या नात्यातील हा गुंता सुटतो का, हे ‘पाँडीचेरी’ पाहिल्यावरच कळेल.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत ‘पाँडीचेरी’ या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. तर नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


रश्मिका मंदानाने सांगितला तिच्या स्वप्नातील ‘राजकुमार’


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -