घर मनोरंजन 'पोन्नियिन सेल्वन 2'ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केला करोडोंचा टप्पा पार

‘पोन्नियिन सेल्वन 2’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी केला करोडोंचा टप्पा पार

Subscribe

लोकप्रिय ऐतिहासिक चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 2’ शुक्रवारी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्नियिन सेल्वन 2’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यासोबतच पहिल्या पार्टप्रमाणेच ‘PS 2’ ने देखील भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आहे.

तामिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘PS1’ प्रमाणेच आता ‘PS2’ देखील नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. एवढेच नाही तर ‘PS2’ ने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे.

‘पोन्नियिन सेल्वन 2’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

- Advertisement -

‘पोनियिन सेल्वन 2’ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये गर्दी झाली. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली. ‘पोनियिन सेल्वन 2’ ने पहिल्या दिवशी 32 कोटी कमावले.
त्यामुळे या चित्रपटाची सुरुवात पाहता हा 2023 वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनू शकतो .

‘पोन्नियिन सेल्वन 2’ची स्टार कास्ट

बिग बजेट आणि मल्टीस्टारर चित्रपट ‘पोन्नियिन सेल्वन 2’ तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये रिलीज झाला आहे. यात चियान विक्रम, ऐश्वर्या राय, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल, हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा :

सुरुवातीच्या काळात घाबरुन अमेरिकेतल्या बाथरुममध्ये जेवायची प्रियंका चोप्रा

- Advertisment -