घरमनोरंजनलवकरच 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’

लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’

Subscribe

दिग्दर्शक मणिरत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली. यातील प्रत्येकाच्या अभिनयाचे प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक देखील करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायने या चित्रपटाच्या माध्यमातून जवळपास 4 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. दरम्यान, आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ‘पोन्नियिन सेल्वन’ लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणीर आहे.

ओटीटीवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’
चोल साम्राज्यावर आधारित असलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क आकारावे लागणार आहे. कारण हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम रेंडलवर प्रदर्शित होणार आहे. 4 नोव्हेंबर 2022, पासून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध होईल.

- Advertisement -

‘पोन्नियिन सेल्वन’ने जगभरातून कमावले इतके कोटी
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाने जगभरातून आत्तापर्यंत 480 कोटी रुपये कमावले आहेत. लवकरच हा आकडा 500 कोटींचा टप्पा पार करत असल्याचं म्हटलं जात आहे. 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील चोल साम्राज्यावर आधारित आहे. यामध्ये कावेरी नदीचा मुलगा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक होण्यापूर्वीचा राजा चोल बनण्याची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान याने संगीत दिले आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

- Advertisement -

या चित्रपटात सुद्धा झळकणार ऐश्वर्या

या चित्रपटानंतर ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘169’ मध्ये दिसणार आहे. याआधी ऐश्वर्या राय रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटामध्ये दिसली होती.

 

 


हेही वाचा :

‘अनटोल्ड स्टोरी: मिशन इंडिया’ मध्ये उलगडणार रणरागिणीची गोष्ट

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -