घरमनोरंजनपूजा हेगडे आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये? पुढच्या दोन चित्रपटांमध्ये करणार एकत्र काम

पूजा हेगडे आणि सलमान खान रिलेशनशिपमध्ये? पुढच्या दोन चित्रपटांमध्ये करणार एकत्र काम

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील सतत चर्तेत असतो. अनेकदा सलमान वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. ज्यामध्ये त्याच्या प्रेम प्रकरणांचा देखील समावेश आहे. आत्तापर्यंत सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. परंतु तरीही त्याचं अजून लग्न होऊ शकलं नाही. आता याचं दरम्यान, सलमानबाबत नवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला त्याची नवीन पार्टनर मिळालेली आहे. असं म्हटलं जातंय की, सलमान खान आणि अभिनेत्री पूजा हेगडेला डेट करत आहे. सध्या ते दोघेही त्यांच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करत आहेत.

- Advertisement -

एका व्हायरल ट्वीटवरुन ही माहिती समोर आली आहे. हे ट्वीट पाहून सर्वंचजण आश्चर्यचकित झाले आहेत. खरंतर, या ट्वीटमध्ये असं लिहिण्यात आलंय की, “ब्रेकिंग न्यूज- टाउनमध्ये आता नवीन कपल आलं आहे. सलमान खान, पूजा हेगडेच्या प्रेमात पडला आहे. सलमानच्या प्रोडक्शन हाऊसमधील पुढच्या 2 चित्रपटांसाठी देखील पूजा हेगडेला घेण्याचे ठरवले आहे. शिवाय सलमान आणि पूजा अलीकडे एकमेकांसोबत खूप वेळ एकत्र असतात. या गोष्टींचा खुलासा सलमानच्या सूत्रांकडून करण्यात आला आहे.”

‘या’ चित्रपटांमध्ये देखील दिसणार सलमान खान
सलमान खानचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड खूप जबरदस्त आहे. 300 कोटींच्या क्लबमधील 4 चित्रपट केवळ सलमानचे आहेत. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अंतिम आणि राधे या चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. आगामी काळात सलमान खान ‘किक 2’, ‘नो एंट्री 2’ आणि ‘टायगर 3’ मध्ये झळकणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘सिंघम अगेन’ चित्रपटात दीपिका पादुकोण साकारणार ‘लेडी सिंघम’ची भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -