घरमनोरंजनRakhi Sawant : पूनम तू वेडी आहेस का?, मृत्यूची खोटी बातमी दिल्याने...

Rakhi Sawant : पूनम तू वेडी आहेस का?, मृत्यूची खोटी बातमी दिल्याने राखी सावंत संतापली!

Subscribe

अभिनेत्री आणि मॅाडेल पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले अशी बातमी काल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली होती. पूनम पांडेंच्या निधनाची बातमी ही अफवा असल्याचं समोर आले आहे. स्वत: पूनमने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी माहिती दिली. लोकांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्रीने हे मोठं पाऊल उचललं आहे. अशातच पूनम पांडेची खास मैत्रीण राखी सावंत हीची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

राखी सावंत म्हणाली, “पूनम तू तर आम्हाला मोठा धक्काच दिला होतास, तू वेडी आहेस का?, स्वत:च्या मरणाचा पब्लिसिटी स्टंट कोण करतं?, सर्व माध्यम आणि चाहत्यावर्गासह माझ्याही भावनांचा खेळ केला आहेस. आणि आता तू जिवंत असल्याचा व्हिडिओ बनवला आहेस. नक्की काय सुरु आहे तुझ?, तुझ्या निधनाने मी दु:खी झाले होते”.

- Advertisement -

राखी सावंत पुढे म्हणाली, “माझा रिल व्हिडीओ मला सोशल मीडियावर शेअर करायचा होता. पण माझ्या मैत्रीणीचं निधन झालं आहे. आज मी काहीही चांगलं काम करणार नाही असं म्हणत मी तो व्हिडीओ शेअर केला नाही. तुझ्यामुळे मी खूप दु:खी झाले होते. मला अश्रू अनावर झाले होते. मी तुला कितीवेळा फोन केले. तू एकही उचलला नाहीस. तू नॅनो कार आहेस आणि मी मर्सिडिज आहे. पण तू आनंदी राहा..छान आयुष्य जग..पुन्हा असं वागू नको”.

पूनमच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. तर दुसरीकडे नेटकऱ्यांनी हा पब्लिसिटी स्टंट आहे, अशी शक्यताही वर्तवली होती.अखेर पूनमने व्हिडीओ शेअर करत या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

निधनाच्या बातम्यांनतर पूनम पांडेची पोस्ट

पूनमने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. व्हिडिओच्या सुरुवातीला पूनमने माफी मागितली, पूनम म्हणाली, “मी जिवंत आहे सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे सर्व केलं.
“हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करुन HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. आपण एकत्र मिळून या कॅन्सरबाबत जनजागृती करुया. तूम्ही माझ्या वेबसाईटला जरुर भेट द्या. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी (http:www.poonampandeyisalive) ही वेबसाईट लॅान्च केली आहे” असं पूनम पांडेनी या व्हिडिओत सांगितले आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -