HomeमनोरंजनPoonam Dhillon: अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी

Poonam Dhillon: अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी

Subscribe

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोच्या घरी धक्कादायक घटना घडली आहे. पूनम यांच्या घरी चोरी झाली असून त्यांच्या मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. अभिनेत्रीने पोलिसात तक्रार केली असून पोलिसांनी चोराला अटक केली आहे. समीर अन्सारी असे अटक आरोपीचे नाव आहे

पूनम ढिल्लो यांच्या खार येथील फ्लॅटमधून 1 लाख रुपयाचा डायमंड नेकलेस, 35 हजार रुपयांची रोख आणि काही अमेरिकी डॉलरही चोरीला गेले. मिडिया रिपोर्टनुसार, पूनम यांच्या घरी पेंटिंगचं काम सुरु होतं. याचाच चोराने फायदा उचलला आणि घरातील कपाट खुले पाहून त्याने सामान चोरी केलं.

- Advertisement -

अभिनेत्री पूनम या जुहूमध्ये राहतात तर मुलगा अनमोल खारच्या घरी राहतो. पूनम कधीकधी खारच्या घरीही राहत असायच्या. पूनमचा मुलगा दुबईवरुन घरी आला तेव्हा त्याला बरंच सामान गायब झालेलं दिसलं. अनमोलने पोलिसांना याची माहिती दिली आणि यानंतर पोलिसांनी अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली. पोलिस तपासात निष्पन्न झाले की, आरोपी अन्सारी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान फ्लॅट रंगविण्यासाठी घरी होता. यावेळी त्यांनी उघड्या कपाटाचा फायदा घेत सामानाची चोरी केली. आरोपींनी चोरीच्या काही पैशांची पार्टीही केली होती.

पूनम यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पूनम ढिल्लो यांनी करिअरची सुरुवात त्रिशूल (1978) या चित्रपटातून केली होती, ज्यामध्ये त्यांची छोटीशी भूमिका होती. त्यांचा पहिला प्रमुख चित्रपट नूरी (1979) हा हिट ठरला आणि त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

- Advertisement -

हेही वाचा : Tax Free Income : टॅक्स फ्री पैसे कसे कमवायचे ?


Edited By – Nikita Shinde

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -