घरमनोरंजनPoonam Pandey: मी जिवंत आहे! नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पूनमची कबुली

Poonam Pandey: मी जिवंत आहे! नाट्यमय घडामोडीनंतर अखेर पूनमची कबुली

Subscribe

अभिनेत्री आणि मॅाडेल पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले अशी बातमी काल तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन देण्यात आली होती. पूनमच्या निधनाने बऱ्याच लोकांना धक्का देखील बसला होता. मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर 24 तासांने पूनम पांडे जिवंत असल्याची बातमी आली आहे. स्वत: पूनमने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

- Advertisement -

व्हिडिओच्या सुरुवातीला पूनमने माफी मागितली, पूनम म्हणाली, “मी जिवंत आहे, सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे सर्व केलं. हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो फक्त तुम्हाला काही टेस्ट करुन HPV व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. आपण एकत्र मिळून या कॅन्सरबाबत जनजागृती करुया. तूम्ही माझ्या वेबसाईटला जरुर भेट द्या. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी (http:www.poonampandeyisalive) ही वेबसाईट लॅान्च केली आहे” असं पूनम पांडेनी या व्हिडिओत सांगितले आहे.

मात्र स्वत:च्या निधनाची खोटी बातमी शेअर केल्याने पूनम पांडे विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अनेक नेटकरी ट्रोल करत आहेत.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय-

अभिनेत्री आणि मॅाडेल पूनम पांडेंचं वयाच्या 32 व्या वर्षी सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले अशी माहिती तिच्या टीमकडून देण्यात आली होती. पूनमच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला होता. तिची व्यवस्थापक पारुल चावला हिने देखील एका मुलाखती या वृत्ताला दुजोरा दिला होता. पूनमला काही दिवसांपूर्वीच सर्व्हायकल कॅन्सरचे निदान झाले होते, या आजाराचा तिचा शेवटचा टप्पा होता. अखेरच्या टप्प्यात तिला खूप त्रास सहन करावा लागत होता.
त्यानंतर तिच्या चाहत्यांनी श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट देखील केल्या होत्या. तर काहींनी ही फेक न्यूज तर नाही! अशीही शंका उपस्थित केली होती. दरम्यान, चित्रपट जगतातील अनेकांनी पूनम पांडेला श्रद्धांजलीही वाहिली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -