घरमनोरंजनPoonam Pandey Death : World Cup 2011 मुळे पूनम पांडे आली होती...

Poonam Pandey Death : World Cup 2011 मुळे पूनम पांडे आली होती चर्चेत

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेने अखेरचा श्वास घेतला. पूनमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमकडून तिच्या निधनाची बातमी शेअर करण्यात आली आहे. ही बातमी वाचताच तिच्या चाहत्यांना मोठ्ठा धक्का बसला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पूनम मांडेच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिच्या टीमने लिहिलंय की,“आजची सकाळ आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे. कॅन्सरशी झुंज देणारी आपली लाडकी पूनम पांडे आपल्याला सोडून गेली. संपर्कात आलेल्या सर्वांनाच तिने प्रेम दिलं आहे. आता यातून बाहेर पडायला आम्हाला थोडा वेळ द्यावा एवढी विनंती”.

- Advertisement -
हेही वाचा : Poonam Pandey Death : मॉडेल पूनम पांडेचं सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन

World Cup 2011 मुळे आली होती चर्चेत

पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती. पूनम पांडेने 2011 मध्ये एक व्यक्तव्य केलं होता की, जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर ती न्यूड फोटोशूट करेल. 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला असला तरी पूनम पांडे ने तसे केले नाही. लोकप्रियता मिळविण्यासाठी तिने अशी विधाने केल्याचा आरोप अनेकांनी त्यावेळी केला होता. या दाव्यांमुळे ती पहिल्यांदाच वादात आली. पूनम पांडे शेवटची कंगना रनौतच्या रिॲलिटी शोमध्ये दिसली होती. दरम्यान, पूनमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिचं लग्न सॅम बॉम्बेसोबत झाले होते. हे लग्न सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. 2020 मध्ये लग्नानंतर तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

सरव्हायकल कॅन्सर कशामुळे होतो?

बदलत्या लाइफस्टाइलमुळे हल्ली अनेक महिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरच्या बळी ठरत आहेत. पूनम पांडेचा मृत्यू सरव्हायकल कॅन्सरमुळे झाला. हा कॅन्सर गर्भाशयाच्या पेशींमध्ये विकसित होतो. हा गर्भाशयाचा खालचा भाग आहे, जो योनीला जोडतो. हा कॅन्सर केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर महिलांसाठी गंभीर समस्या बनली आहे. HPV आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कॅन्सरशी संबंधित सेक्सशुल ट्रान्समिटेड डिसीज होण्यापासून बचाव करायचा असेल तर एकाच जोडीदारासोबत लैगिक संबंध ठेवायला हवेत. याशिवाय सुरक्षित लैगिक संबंध ठेवायला हवेत.


हेही वाचा : गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर कसा टाळाल?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -