घरमनोरंजनPoonam Pandey Death : कोट्यावधींची मालकीण होती पूनम पांडे

Poonam Pandey Death : कोट्यावधींची मालकीण होती पूनम पांडे

Subscribe

मॉडेल पूनम पांडेचं 1 फेब्रुवारीच्या रात्री सरव्हायकल कॅन्सरने निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी पूनम पांडेने अखेरचा श्वास घेतला. पूनमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या टीमकडून तिच्या निधनाची बातमी शेअर करण्यात आली आहे. ही बातमी वाचताच तिच्या चाहत्यांना मोठ्ठा धक्का बसला आहे. चित्रपट आणि मॉडेलिंग करुन पूनमने करोडोंची संपत्ती जमवली होती. आयुष्यभर कमावलेली ही संपत्ती पूनम मागे सोडून गेली आहे.

कोट्यावधींची मालकीण होती पूनम

 

View this post on Instagram

 

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

पूनम पांडेची एकूण संपत्ती जवळपास 52 कोटी रुपये इतकी आहे. मुंबईतील वांद्रे येथे तिची आलिशान अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. तसेच तिच्याकडे लग्झरी कारसुद्धा आहेत. तिच्याकडे BMW 5 सीरिजमधील सेडान कार देखील आहे. याची किंमत जवळपास 55 लाख रुपये आहे. अभिनय आणि मॉडेलिंगशिवाय तिने बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलंय. ती एका चित्रपटासाठी जवळपास एक कोटी रुपये मानधन घेत होती.

- Advertisement -

दरम्यान, पूनम पांडे शेवटची कंगना रनौतच्या रिॲलिटी ‘लॉकअप’ शोमध्ये दिसली होती. दरम्यान, पूनमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर तिचं लग्न सॅम बॉम्बेसोबत झाले होते. हे लग्न सगळ्यांसाठीच सरप्राईज होतं. मात्र, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. 2020 मध्ये लग्नानंतर तिने पती सॅम बॉम्बेवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.

 

- Advertisement -

हेही वाचा :

CID : कुछ तो गडबड है दया…, ‘या’ कारणामुळे लतादीदींच्या लाडक्या मालिकेने घेतला निरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -