Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनPoonam Pandey : फॅनकडून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न, पूनम पांडेने दिला धक्का

Poonam Pandey : फॅनकडून गैरवर्तन करण्याचा प्रयत्न, पूनम पांडेने दिला धक्का

Subscribe

अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. मध्यंतरी पूनम पांडे हिने चर्चेत राहण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला होता. त्यामुळे हल्ली तिच्यासोबत कोणतीही घटना घडल्यास प्रेक्षकांना त्यावर विश्वास ठेवणे कठीण बसत आहे.

मुंबई : अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. मध्यंतरी पूनम पांडे हिने चर्चेत राहण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला होता. त्यामुळे हल्ली तिच्यासोबत कोणतीही घटना घडल्यास प्रेक्षकांना त्यावर विश्वास ठेवणे कठीण बसत आहे. अशातच आता पूनम पांडे हिच्यासोबत एक अशी घटना घडली आहे की, त्या घटनेवरही लोकांना विश्वास बसत ठेवता येच नाहीये. कारण सध्या पूनमसोबत अशीच एका घटना घडली आहे, ज्यामध्ये तिचा एक चाहता तिच्याशी गैरवर्तन करत आहे. यावेळी पूनम त्याला जोरात धक्का देऊन बाजूला होते. परंतु, हे पूनमनेच तिच्या चाहत्याला करण्यास सांगितले असेल, असे मत लोकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Poonam Pandey fan trying to abbused with her)

हल्ली अभिनेता, अभिनेत्रींसमोर पापाराझींचा गराडा पाहायला मिळतो. मुंबईत एका ठिकाणी पूनम पांडे पोहोचली असता, तिला पापाराझींनी गाठले. पूनम यावेळी नेहमीप्रमाणेच बोल्ड ड्रेस घालून आली होती. पूनमने शिमरी लाल रंगाचा डीप नेक बॉडीकॉन ड्रेस घातला होता. त्यामुळे ती पापाराझींच्या कॅमेऱ्यांसमोर पोझ देऊ लागली. पण याचवेळी तिचा एक चाहता पाठीमागून आला आणि त्याने तिला सेल्फीची विनंती केली. यावेळी ती काही बोलण्याआधीच त्याने त्याच्या फोनमध्ये तिच्यासोबत सेल्फी घेण्याची घाई केली. पण पूनमचा चाहता काही इतक्यावरच थांबला नाही तर त्याने तिच्या गालावर किस करण्याचाही प्रयत्न केला.

हेही वाचा… Govinda Wife Sunita : त्याला मूर्ख लोक आवडतात, गोविंदाविषयी स्पष्टचं बोलली सुनीता अहुजा

पूनम पांडेने चाहता लगट करत असल्याचे पाहात आणि तो किस करत असल्याचे लक्षात घेताच त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून लांब झाली. पण यावेळी तिथे उपस्थित असलेले सर्वच जण शॉक होतात. पण काही पापाराझी पुढे येऊन पूनमच्या चाहत्याला लांब घेऊन जातात. तर तू काय करत आहेस, असे म्हणत तिच्या चाहत्याला हाकलून लावतात. पूनमसोबत तिच्या चाहत्याने केलेले हे गैरवर्तन कॅमेऱ्यात कैद झालेले आहे. पण ही घटना घडली आणि मागील वेळेस प्रमाणे पूनम पांडेने घडवून आणली, असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. कारण स्वतःला डेरिंगबाज म्हणणारी पूनम या घटनेवेळी त्या चाहत्याच्या कानशिलात देखील लगावू शकत होती, अशा कमेंट नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)