Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन प्रेग्नेंसीच्या चर्चांवर पूनम पांडेने केला खुलासा, म्हणाली आई होणे आनंदाची बाब आहे

प्रेग्नेंसीच्या चर्चांवर पूनम पांडेने केला खुलासा, म्हणाली आई होणे आनंदाची बाब आहे

पूनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगामे पसरत आहेत. पण पूनमने या व्हायरल होणाऱ्या चर्चांवर भाष्या करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडीयावर दररोज काही ना काही व्हायरल व्हिडिओ,फेक न्यूज,गॉसिपच्या चर्चा तूफान रंगत असतात. नुकतच सोशल मीडीयावर गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेची जोरदार चर्चा रंगत आहे. पूनम प्रेग्नंट असल्याच्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरत आहेत. पण पूनमने या व्हायरल होणाऱ्या बातम्यावर भाष्य करत सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. पूनमने व्हायरल होणाऱ्या न्यूज खोट्या अफवा असल्याचे स्पष्ट केलं आहे. नुकतच पूनमने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या मुलाखतीदरम्यान तिला गरोदर आहेस की नाही तसेच सोशल मीडीयावर व्हायरल होत असलेल्या चर्चांविषयी विचारण्यात आले. तेव्हा ती म्हणाली, ‘माझ्या व्यक्तीगत तसेच व्यवसायिक आयुष्याविषयी सर्वांना माहिती आहे. त्यामुळे जर मी प्रेग्नंट असते तर त्याबाबत नक्की सर्वांना आनंदाने माहिती दिली असती. आई होणे सर्वच महिलांसाठी आनंदाची बातमी असते. पण मी प्रेग्नंट नाही. अशा अफवा पसवरण्यापेक्षा एकदा लोकांनी मला विचारायचे होते.’

- Advertisement -

पूनमने जुलै २०२०मध्ये सॅम बॉम्बेसोबत साखरपूडा उरकला होता. त्यानंतर दोघांनी सप्टेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये सॅम आणि पूनमने वांद्रे येथे लग्न केले होते. यानंतर पूनम आणि सॅम हनिमूनसाठी गोव्याला गेले असताना दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. पतीने मारहाण केल्याचा आरोप करत पूनमने पती विरोधात गोवा पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सॅमला अटक झाली होती. पण काही दिवसातच त्यांच्यामधील वाद मिटला आणि दोघेही एकत्र आले.


हे हि वाचा – ‘Kill Bill’ हॉलिवूटपटाच्या हिंदी रीमेकमध्ये कृति सैननची वर्णी? अनुराग कश्यप करणार दिग्दर्शन


- Advertisement -

 

- Advertisement -