घरमनोरंजनPoonam Pandey : पूनम पांडेचे डोक भिंतीवर आपटले, अन् तोंडावर मारला ठोसा,...

Poonam Pandey : पूनम पांडेचे डोक भिंतीवर आपटले, अन् तोंडावर मारला ठोसा, तक्रारीनंतर नवऱ्याला झाली अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बेला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बेविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी सायंकाळी वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली. दरम्यान पूनम पांडे हिला भिंतीवर आपडल्याने डोक्यावर जखमा झाल्या होत्या. तर डोळ्यावर आणि चेहऱ्यावर ठोसा मारल्याचा खूणा दिसत होत्या. त्यामुळे तक्रार दाखल केल्यानंतर पूनम पांडे हिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या वांद्रे पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सॅम बॉम्बेविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या डोक्यावर, डोळ्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत, मात्र पूनम आणि सॅम यांच्या भांडण झाल्याची काही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. दरम्यान सोमवारीच सॅम बॉम्बे याला कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टानं सॅम बॉम्बेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पूनम पांडेने पती सॅम बॉम्बेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही लग्नानंतर पूनमने मारहाण केल्याप्रकरणी पती सॅम बॉम्बेविरोधात तक्रार दाखल केली होती. यात पूनमने सॅमविरोधात शारीरिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले होते. याप्रकरणी तिने गोवा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सॅम बॉम्बेला पोलिसांनी अटक केली मात्र दुसऱ्या दिवशी त्याला जामीन मिळाला.

- Advertisement -

गेल्या वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या पूनम आणि सॅम यांनी १ सप्टेंबर २०२० रोजी वांद्रे येथील त्यांच्या घरी लग्न केले. त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर करत तिने इन्स्टाग्रामवर लिहिले की, “तुझ्यासोबत सात आयुष्याची वाट पाहत आहे.” मात्र लग्नाच्या अवघ्या १२ दिवसानंतरच पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे यांच्यातील वाद समोर आला.

अश्लील व्हिडीओप्रकरणी पूनम-सॅम संशयित

राज कुंद्रा पॉर्नोग्राफी फिल्म प्रकरणी पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांना गोवा पोलिसांनी अटक केली होती. राज कुंद्रा प्रदर्शित व्हिडीओच्या माध्यमातून अश्लीलता पसरवण्याच्या आरोपाखाली पूनम पांडेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र पूनम पांडे आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांना प्रत्येकी २०,००० रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीनावर सोडण्यात आले होतं.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -