HomeमनोरंजनPoonam Pandey : महाकुंभात पूनम पांडेने केलं अमृत स्नान, म्हणाली - माझी...

Poonam Pandey : महाकुंभात पूनम पांडेने केलं अमृत स्नान, म्हणाली – माझी पापं धुवून गेली

Subscribe

अभिनेत्री, मॉडेल पूनम पांडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड अंदाजामुळे तर कधी वादग्रस्त विधानांमुळे. सध्या ती एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरली आहे. मौनी अमावास्येच्या निमित्ताने पूनम पांडे थेट प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात पोहोचली. इतकेच नव्हे तर तिने गंगेत अमृत स्नानदेखील केले. यावेळी तिने सोशल मीडियावर बरेच फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोत ती कुंभमेळ्यातील गर्दीत अडकल्याचे दिसत आहे. तर व्हिडिओत स्कुटीवरून संगमाच्या दिशेने जाताना दिसतेय. (poonam pandey take holy dip in mahakumbh 2025)

पूनम पांडेने केले अमृत स्नान

पूनम पांडे कुंभमेळ्यात अमृत स्नान करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये पोहोचली. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. सोबतच अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तिने स्वतःचा अनुभव सांगितला आहे. पूनमने शेअर केलेल्या एका फोटोत ती ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दिसत आहे. शिवाय संगमापर्यंत पोहोचण्यासाठी तिने स्कूटी राईड केल्याचेही आपण या पोस्टमध्ये पाहू शकतो. पूनमने गंगा नदीत अमृत स्नान केल्यानंतर म्हटले, ‘माझी सर्व पापे धुवून गेली’. यासोबतच चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर तिने दुःखही व्यक्त केले आहे. हे सर्व फोटो आणि व्हिडीओ तिने अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यात पूनम तिच्या टीमसोबत दिसतेय.

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर व्यक्त केला शोक

पूनमने महाकुंभमध्ये मौनी अमावास्येवेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. तिने म्हटले, ‘ही घटना खरोखरंच वाईट आणि दुर्भाग्यपूर्ण आहे’. महाकुंभमेळ्यातील दुर्घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाला असून काही लोक गंभीर जखमी असल्याचे समजले आहे. सरकारने या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपयांची भरपाई देण्याचे जाहीर केले आहे. माहितीनुसार, बुधवारी मिलिंद सोमणनेदेखील पत्नी अंकितासोबत प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात अमृतस्नान केले. यानंतर प्रतिक्रिया देताना त्यानेही कुंभमेळ्यातील दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

हेही पहा –

Adhir Bhat : इमरजेंसी फेम अभिनेत्याचे काश्मीरशी आहे खास कनेक्शन