Pornography Case: हायकोर्टाचा दिलासा! अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक न करण्याचे निर्देश

Gehana Vasisth
Raj Kundra Case: गहना वशिष्ठ

पॉर्न फिल्म प्रकरणात अभिनेत्री गहाना वसिष्ठला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गहाना वशिष्ठ हिचाअटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. गरज पडल्यास तपासात सहभागी होण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गहानाला दिले आहेत.

पॉर्न फिल्म प्रकरणात मुंबई पोलिसांनी फेब्रुवारी महिन्यात एफआयआर नोंदवला होता. यानंतर गहाना वसिष्ठला पोलिसांनी अटक केली आणि तुरुंगात पाठवले होते. मात्र, नंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे गहनाची जामिनावर सुटका करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेव्हा या प्रकरणाचा तपास केला तेव्हा त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राचा सहभाग असल्याचे समोर आले. यानंतर, या तपासात राज कुंद्रा आणि गहाना वसिष्ठ यांच्या विरोधात आणखी काही गुन्हे जोडली गेली आहेत, ज्यात जामीन मिळणे खूप अशक्य असल्याचे सांगितले जात आहे.

गहना वशिष्ठवर त्यांच्या अश्लील चित्रपटांमध्ये मुलींना जबरदस्तीने काम करायला भाग पाडले आणि त्यांचे न्यूड सीन शूट करण्याचा आरोप आहे. त्यांच्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या काही मुलींनीही गहनावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, गहना त्या चित्रपटांचे दिग्दर्शिका होती आणि त्यांनी बोल्ड सीन्सच्या नावावर न्यूड सीन शूट केले. राज कुंद्राच्या अटकेनंतर गहना प्रकाशझोतात आली होता. त्यानंतर ती लोकांना इरॉटिक आणि पॉर्न व्हिडिओंमधील फरक स्पष्ट करताना दिसली. तिने ‘गंधी बात’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे. गेहनाने आतापर्यंत ७० हून अधिक जाहिराती केल्या आहेत आणि गेल्या पाच वर्षात तिने साऊथच्या ३० पेक्षा जास्त चित्रपटांमध्येही काम केले. गहना वशिष्ठाची गणना बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.