Porn Film Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून अभिनेत्री शर्लिन चोप्राला अटकेपासून दिलासा

पॉर्नोग्राफी प्रकरणात याआधी देखील इतर आरोपींनी दिलासा देण्यात आला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील तक्रारीमध्ये अभिनेत्री पूनम पांडेसह शर्लिन चोप्राचे नाव होते.

Porn Film Case supreme court grants pre arrest bail to sherlyn chopra
Porn Films case : शर्लिन चोप्राला Porn Film Case: पॉर्नोग्राफी प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून अभिनेत्री शर्लिन चोप्राला अटकेपासून दिलासा

पॉर्नोग्राफी ( Porn Film Case)  प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्राला ( sherlyn chopra ) सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शर्लिनला अटकेपासून दिलासा मिळाला असून शर्निल चोप्राचा अटकपूर्व जामिन सुप्रीम कोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे.  शर्लिनचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती विनीत सरन आणि अनिरुद्ध बोस यांच्या खंडपीठाने शर्निल चोप्राच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली होती.

शर्लिन चोप्राचे वकील सुनील फर्नांडिस यांनी म्हटले आहे की, पॉर्नोग्राफी प्रकरणात याआधी देखील इतर आरोपींनी दिलासा देण्यात आला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणातील तक्रारीमध्ये अभिनेत्री पूनम पांडेसह शर्लिन चोप्राचे नाव होते. सुप्रीम कोर्टाने या आधी १८ जानेवारी रोजी पूनम पांडेचा अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्याआधी २५ नोव्हेंबरला हाय कोर्टाने शर्लिनचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राला अवैध पॉर्नोग्राफी प्रकरणात कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना राज कुंद्रा जेलमध्ये होता. महिलांचे अश्लील व्हिडीओ तयार करुन ते विकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. राज कुंद्राने पहिल्यांदा अकटपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता मात्र त्याचा अर्ज फेटाळत त्याला अटक करण्यात आली. कोर्टात चौकशीसाठी हजर केल्यानंतर त्याने मला या प्रकरणात गोवल्याचा दावा केला होता.

शर्लिन चोप्रा हीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत राज कुंद्रा आणि पॉर्नोग्राफी व्हिडिओवर आपले मत मांडले होते. त्याचप्रमाणे शर्लिनने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रावर लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. शिवाय फसवणूक केल्याचा आरोप देखील शर्लिनने लावला होता.


हेही वाचा – शर्लिन चोप्राविरोधात शिल्पा आणि राज कुंद्राने ठोकला ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा