घरमनोरंजनपॉर्नस्टार सनी लिओनीला करायचं आहे धार्मिक सिनेमात काम

पॉर्नस्टार सनी लिओनीला करायचं आहे धार्मिक सिनेमात काम

Subscribe

अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सनी लिओनीने वयाच्या 41व्या वर्षी देखील स्वतःला खूप मेन्टेन ठेवलं आहे. दरम्यान, नेहमीच बोल्ड लूकमध्ये दिसणाऱ्या सनी लिओनीचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यामध्ये ती देसी लूकमध्ये दिसत आहे. सनी लिओनीचे हे फोटो पाहून तिचे चाहते देखील तिचं प्रचंड कौतुक करत आहेत.

सनी लिओनीने केली गंगा नदीची आरती

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

सोशल मीडियावर व्हायरल होत असणाऱ्या फोटोमध्ये सनीने लिओनीने गुलाबी रंगाची ड्रेस घातला असून ती वाराणसी येथे गंगा नदीची आरती करताना दिसत आहे. खरं तर, सनी लिओनीचा नवीन म्युझिक अल्बम ‘थर्ड पार्टी’ लवकरच रिलीज होणार आहे, ज्याचे ती सतत प्रमोशन करत आहे. या गाण्यात सनी लिओनीसोबत माजी आयएएस अभिषेक सिंग देखील दिसणार आहे. या गाण्याच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी गुरुवारी वाराणसीला पोहोचली आणि गंगा आरतीमध्ये सहभागी झाली. सोशल मीडियावर सनी लिओनीचा एक व्हिडिओ आणि काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये सनी लिओनी माजी आयएएस अभिषेकसोबत पूजा करताना दिसत आहे. यावेळी सनी लिओनीने सांगितले की, तिला धार्मिक चित्रपट करायचे आहेत, पण त्यासाठी आधी बरेच काही जाणून घेणं आवश्यक आहे.

- Advertisement -

बिग बॉसमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण

सनी लिओनीने बिग बॉसमधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आधी अॅडल्ट इंडस्ट्री सोडली आणि बिग बॉसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ती बॉलिवूडमधील अनेक आयटम सॉन्गमध्ये दिसली. याशिवाय ती गेल्या वर्षी ‘ओ माय घोस्ट’ या चित्रपटात दिसली होती.

 

- Advertisement -

हेही वाचा :

लेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या-अभिषेकने शेअर केली खास पोस्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -