Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन PornFilmsCase :पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने शूटींगला मारली दांडी

PornFilmsCase :पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने शूटींगला मारली दांडी

माहितीनूसार सध्या विकेंडमध्ये होणाऱ्या दोन्ही एपिसोड्सच्या शूटिंगमध्ये फक्त गीता कपूर आणि अनुराग बसु हजर आहेत.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा राज कुंद्रावर आरोप आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचा तपास सुरु झाला होता. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान कुंद्राचा अश्लील चित्रपट बनवण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.आशातच बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अद्याप संपुर्ण घटनेबाबत काही वक्तव्यं केलं नाहीये. सध्या शिल्पा अत्यंत दु:खी असल्याचे कळतेय. अशातच शिल्पाने सर्व शूटींग रद्द केले असल्याची माहिती समोर येत आहे. शिल्पा सोनी टिव्ही वरील प्रसिद्ध डांन्स शो ‘सुपर डांसर सीजन 4’च्या परीक्षकाच्या खुर्चीत विराजमान आहे. अशातच शिल्पाने घडलेल्या संपुर्ण प्रकरणानंतर शूटींगला जाण्याचे टाळले आहे.(PornFilmsCase: Shilpa Shetty cancels ‘Super Dancer’ shooting after husband Raj Kundra’s arrest)

- Advertisement -

 

माहितीनूसार सध्या विकेंडमध्ये होणाऱ्या दोन्ही एपिसोड्सच्या शूटिंगमध्ये फक्त गीता कपूर आणि अनुराग बसु हजर आहेत. ‘सुपर डांसर 4’ शूटींग सोमवार, मंगळवार या दोन दिवसांपैकी एका दिवशी करण्यात येते. तसेच त्याच दिवशी वीकेंडमधील दोन एपिसोड्स शूट करण्यात येतात.पण यावेळेस शिल्पा शेट्टी सोमवारीच ‘सुपर डांसर 4’ शूटींग पुर्ण करणार होती. यानंतर राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे हे समजल्या नंतर शिल्पाने तिचा निर्णय बदलला असून सर्व शूटींग रद्द केलं आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – निक-प्रियांकाच्या नात्याला झाली तीन वर्षे पुर्ण,रोमँटीक फोटो शेअर करतं केलं प्रेम जाहीर

- Advertisement -