पोस्ट ऑफीस उघडं आहे… लवकरच सुरु होणार ही नवी मालिका

मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ असे या मालिकेचे नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ ह्या मालिकेची ही झलक प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. सोशल मिडियावरही तिची वाहवा होते आहे.

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ मालिकेच्या विषयाला धरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढते आहे. ज्यांनी पोस्ट ऑफिसचा काळ अनुभवला आहे, त्यांच्यासाठी ही झलक स्मरणरंजनवत ठरली आहे आणि ज्यांनी तो काळ अनुभवला नाहीये त्यांच्यासाठीही चर्चेचा विषय ठरली आहे. नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडून या मालिकेत एक हलकाफुलका विषय पाहायला मिळेल. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ ह्या मालिकेतून पोस्ट ऑफिस हा विषय सोनी मराठी वाहिनी घेऊन येते आहे. ही हास्याची मनी ऑर्डर महाराष्ट्राला नक्कीच आवडेल. पाहायला विसरू नका नवी मालिका – ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, लवकरच सोनी मराठी वाहिनीवर.

 


हेही वाचा :

‘इमली’ फेम हेतल यादवच्या कारला ट्रकने दिली जोरदार धडक