घरमनोरंजनअभिनेता प्रभासच्या 'या' नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

अभिनेता प्रभासच्या ‘या’ नव्या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Subscribe

स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्त निर्मात्यांनी मुख्य अभिनेता प्रभासच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवर चित्रपटाची रिलीज डेटही देण्यात आली आहे. प्रभासच्या या नव्या चित्रपटाची सोशल मीडियावरसुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास(south indian actor prabhas) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. एक आघाडीचा अभिनेता म्ह्णून म्हणून प्रभासकडे पाहिले जाते. पार आभासचा अभिनय असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट, प्रशांत नील दिग्दर्शित, विजय किरगांडूर निर्मित, ‘सालार’, 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या हाय-व्होल्टेज एक्शन फिल्मचा फर्स्ट लूक लाँच झाल्यापासूनच चित्रपटाविषयी चर्चा सुरू आहे. या चित्रपटात प्रभासला त्याच्या सर्वात क्रूर, रॉ आणि मोठ्या अवतारात पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षा करू शकत नाहीत. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्त निर्मात्यांनी मुख्य अभिनेता प्रभासच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवर चित्रपटाची रिलीज डेटही देण्यात आली आहे. प्रभासच्या या नव्या चित्रपटाची सोशल मीडियावरसुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

हे ही वाचा – मनोरंजनाचा डबलडोस; ‘या’ आठवड्यात चित्रपटांसह वेब सीरिजसुद्धा OTT वर प्रदर्शित होणार

- Advertisement -

‘सालार'(salaar) हा एक मोठा मास एक्शन आणि साहसी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण भारत, युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका सारख्या अनेक देशांमध्ये करण्यात आले आहे. प्रोजेक्टचे पहिले शेड्यूल आधीच पूर्ण झाले असून प्रभास लवकरच चित्रपटाचे शेवटचे शेड्यूल पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. संपूर्ण टीम चित्रपट चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी त्यांच्या सर्व प्रयत्नांसह मोठ्या प्रमाणावर काम करत असताना, उर्वरित चित्रपटाच्या VFX वर काम करत असून निर्मात्यांनी परदेशी स्टुडिओ भाड्याने घेतला आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Independence Day 2022: देशाच्या 75 वर्षांच्या वाटचालीत महाराष्ट्रातील या रत्नांचा मोलाचा वाटा

‘सालार'(salaar) हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रभास असून त्याचे संपूर्ण भारतातील आकर्षण अप्रतिम आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रुती हासन दिसणार असून हा चित्रपट भारतातील ५ भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जगपती बाबू, ईश्‍वरी राव, श्रिया रेड्डी यांच्याशिवाय अष्टपैलू अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सालार आधीच प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉक्स ऑफिस नंबर्ससह इतिहास लिहिणारे काही मोठे पॉवरहाऊस आणखी एक ब्लॉकबस्टर बनवण्यासाठी एकत्र येत आहेत. होंबाले फिल्म्स, प्रचंड किफायतशीर फ्रँचायझी KGF चे निर्माते आणि भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, बाहुबलीचा मुख्य अभिनेता, उत्कृष्ट कन्टेन्टसह प्रेक्षकांसाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, हे देखील समोर आले आहे की होंबळेचा सालार हा चित्रपट खूप मोठ्या स्केलवर बनवला जात असून त्याचे बजेट 400 पेक्षा जास्त कोटी रुपये आहे. केजीएफची डायनॅमिक टीम आणि तंत्रज्ञ देखील सालारचा एक भाग असताना, आता आपण निश्चितपणे सांगू शकतो की सालारचे युग सुरू झाले आहे.

हे ही वाचा – ‘त्याने आमचा पाठलाग केला नंतर १- २ तास चांगली कंपनी दिली’ गायक महेश काळेने सांगितला ‘तो’ अनुभव

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -