Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन अल्लू अर्जुन अभिनीत "पुष्पा 2: द रुल" या चित्रपटाचे पोस्टर झाले प्रदर्शित

अल्लू अर्जुन अभिनीत “पुष्पा 2: द रुल” या चित्रपटाचे पोस्टर झाले प्रदर्शित

Subscribe

"पुष्पा 2: द रुल"च्या या नव्या पोस्टरने पुष्पा "फ्लावर नहीं फायर है" हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोस्टरमध्ये आयकॉन स्टार अल्लू अर्जुन उर्फ पुष्पराज उठून दिसत आहे. हे अनोखे, पोस्टर खरोखरच सर्वात हटके बनले आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात ‘पुष्पा’ची चर्चा आहे. पुष्पा प्रदर्शित झाल्यानंतर लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळाली. अलीकडेच, या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शित केलेल्या व्हिडिओने प्रेक्षक उत्साहित झाले असून, ह्या व्हिडिओने ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दुसऱ्या भागाविषयीची उत्सुकता अधिक ताणली आहे. पुष्पा चित्रपटाच्या नव्या सिक्वेलमध्ये आणखी काय पहायला मिळेल? या विचाराने चित्रपटप्रेमी आणि अल्लू अर्जुनचे चाहते उत्साही झाले आहेत. 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 4 वाजून 5 मिनिटांनी एका मोठ्या घोषणेने लोकांचे लक्ष वेधून घेतल्यानंतर, निर्मात्यांनी ‘पुष्पा 2: द रुल’च्या धमाकेदार पोस्टर प्रदर्शित केले आहे.

“पुष्पा 2: द रुल”च्या या नव्या पोस्टरने पुष्पा “फ्लावर नहीं फायर है” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. पोस्टरमध्ये आयकॉन स्टार अल्लू अर्जुन उर्फ पुष्पराज उठून दिसत आहे. हे अनोखे, पोस्टर खरोखरच सर्वात हटके बनले आहे.

- Advertisement -

दरम्यान, वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा 2: द रुल’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही, असेच दिसून येत आहे. देशभरात या सिनेमाबाबत होत असलेली चर्चा पाहता, हा चित्रपट देशात इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

दरम्यान, ‘पुष्पा 2: द रुल’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, मिथ्री मूव्ही मेकर्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच, या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल हे प्रमुख भूमिकेत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागाने जसे प्रेक्षकांना वेड लावले तसेच या चित्रपटाचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांना वेड लावणार आहे आणि प्रेमात पाडणार आहे, असे तरी या चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसून येत आहे.

- Advertisement -

17 डिसेंबर 2021 ‘पुष्पा : द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणावर गल्ला जमावला होता. या चित्रपटात अल्लू अर्जुनसह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत होती. तर या चित्रपटामुळे रश्मिकालाही मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर “पुष्पा 2: द रुल” या सिक्वेलसाठी प्रेक्षक सुद्धा मोठया प्रमाणावर उत्सुक आहेत. दरम्यान पुष्पा 2 मध्ये जास्त ऍक्शन आणि अल्लू अर्जुनाचा नवीन डॅशिंग लूक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होत आहे, यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.


हेही वाचा – काही लोक परदेशात जाऊन भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतात, उपराष्ट्रपतींची टीका

- Advertisment -