घरमनोरंजनRashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या आगामी मोशन चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाच्या आगामी मोशन चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित

Subscribe

रश्मिकाच्या 26व्या वाढदिवसानिमित्ताने तिचा अगामी मोशन (Motion) चित्रपटाचा पोस्टर (Poster) निर्मात्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे.

दक्षिणेतील सुपरस्टार रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिचा ब्लॉकबस्टर चित्रपट पुष्पाने सर्व प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. रश्मिकाच्या 26व्या वाढदिवसानिमित्ताने तिचा आगामी मोशन (Motion) चित्रपटाचा पोस्टर (Poster) निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. पोस्टरमध्ये नॅशनल क्रश रश्मिका मंदाना हिने हिजाब परिधान केलेला आहे. तसेच त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हॅप्पी बथर्ड आफरीन असे लिहिले आहे. अजूनही निर्मात्यांनी चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल काही खुलासा केलेला नाही.

 

- Advertisement -

निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रदर्शित केला आणि रश्मिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात. या चित्रपटामध्ये अभिनेता दुलकर सलमान (Dulkar Salman) आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर (mrunal Thakur) प्रमुख भूमिकेत असणार आहेत, असे सांगितले जात आहे. रश्मिकाही मुस्लिम मुलगी आफरीन हे पात्र साकारणार आहे. पोस्टर पाहून हा अंदाज बांधता येतो आहे की, ही लंडनमध्ये राहणारी जिद्दीमुलीचा पात्र साकारणार आहे. या चित्रपटाच्या शीर्षक किंवा कथेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. तसेच या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे.

- Advertisement -

 

रश्मिका मंदानाचा मंगळवारी 26 व्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रश्मिकाचा मोशन चित्रपटाचा पोस्टर खूप धुमाकूळ घालताना दिसत आहे. यूट्यूबवर अपलोड केल्यानंतर काही वेळातच हा खूप व्हायरल झाला आहे. तसेच ट्विटरवर वैजयंती मूव्हीजने चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. याला कॅप्शन देता लिहिले की, ‘आमच्या जिद्दी आफरीनला भेट… रश्मिका वाढदिवसाच्या शुभेच्छा.’ असे लिहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -