घरमनोरंजनविक्की कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' चित्रपटाचं पोस्टर रिलीज

विक्की कौशलच्या ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज

Subscribe

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल, कियारा अडवाणी आणि भूमि पेडणेकर यांचा आगामी ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटाचा पोस्टर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये विक्की कौशल टपोरी लूकमध्ये दिसत आहे तर भूमि पेडणेकर यामध्ये गृहिणीच्या लूकमध्ये दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केलं असून अभिनेत्री कियारा अडनाणी विक्कीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारत आहे.

‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटाचं पोस्टर डिज्नी+हॉटस्टार कडून शेअर करण्यात आलं असून खाली कॅप्शनमध्ये, “गोविंदाची गोष्ट, ही कोणती साधारण गोष्ट नाही”. या पोस्टरवर अनेकजण कमेंट करुन प्रतिक्रिया देत आहेत. युजर्सकडून चित्रपटाच्या पात्रांचे कौतुक केले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

- Advertisement -

या चित्रपटामध्ये विक्की कौशल ‘गोविंदा’ ही भूमिका साकारणार आहे. तर भूमि पेडणेकर विक्कीच्या पत्नीची भूमिका साकारेल तिच्या पात्राचे नाव ‘गौरी’ आहे आणि कियारा अडवाणी विक्कीची भूमिका साकारताना दिसेल तिच्या पात्राचे नाव ‘सुकू’ असणार आहे.

या दिवशी होणार प्रदर्शित
नुकत्याच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर आता विक्की कौशल आणि भूमी पेडणेकरच्या या चित्रपटाची रिलीज डेट देखील शेअर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर 2022 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. परंतु अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा देण्यात आली नाही.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘वध’ चित्रपटात संजय मिश्रा साकारणार अनोखी भूमिका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -