Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'आदिपुरुष' ट्रेलर लॉंचपूर्वी प्रभास आणि कृती दिसले एकत्र

‘आदिपुरुष’ ट्रेलर लॉंचपूर्वी प्रभास आणि कृती दिसले एकत्र

Subscribe

टॉलिवूड अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री कृती सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’चित्रपटामुळे चर्चेत आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून निर्माते चित्रपटाशी संबंधित नवनवीन अपडेट शेअर करत आहेत. अशातच आता ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी ‘आदिपुरुष’चे हैदराबादमधील चित्रपटगृहांमध्ये स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते.

यादरम्यान, चित्रपटाची झलक पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये मोठी गर्दी झाली होती. चित्रपटाचे मुख्य कलाकार प्रभास आणि कृती सेननही दिसले. दोघांना एकत्र पाहून चाहते खूप खुश झाले. दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘आदिपुरुष’ ट्रेलर लॉंचपूर्वी प्रभास आणि कृती दिसले एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

- Advertisement -

नुकताच प्रभास आणि कृती सेननचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये प्रभास आणि क्रिती सेनन एकत्र दिसत आहेत. यादरम्यान दोन्ही कलाकार भारतीय लूकमध्ये दिसले. यावेळी प्रभासने पांढरा शर्ट आणि पँट घातली होती. तर, कृतीने हलक्या निळ्या रंगाची सुंदर नेट साडी घातली होती. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप पसंत केला जात आहे. युजर्स व्हिडिओवर कमेंट करून त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सीता नवमीच्या मुहूर्तावर ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटातील ‘राम सिया राम’चा ऑडिओ टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. सोशल मीडियावर प्रेक्षकांसमोर ठेवलेल्या या ऑडिओ टीझरच्या रिलीजसोबतच त्याच्या कॅप्शनमध्ये देवी सीतेचे वर्णन देखील करण्यात आले होते. ‘आदिपुरुष’ 16 जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये प्रभास आणि कृती सेनन व्यतिरिक्त सैफ अली खान आणि सनी सिंग यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘नीयत’ चित्रपटात विद्या बालन मुख्य भूमिकेत

- Advertisment -