घरताज्या घडामोडीRadhe Shyam Song : मैं इश्क में हू, प्रभास पूजाचं राधे...

Radhe Shyam Song : मैं इश्क में हू, प्रभास पूजाचं राधे श्याममधील नवं गाणं रिलीज

Subscribe

अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे यांचा बहुप्रतिक्षीत राधे श्याम हा सिनेमा रिलीज होण्यास काही दिवस शिल्लक असताना सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमातील प्रभास आणि पूजा यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या ट्रेलरपाहूनच लक्षात आली होती. त्यानंतर आता नव्या गाण्यातून दोघांचा एक नवा अंदाज समोर आला आहे. मैं इश्क में हू हे नवीन गाणे नुकतेच रिलीज झाले असून गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी गाण्याला अफलातून प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियावर गाणं ट्रेंडमध्ये असून गाण्याला अर्ध्या तासाच्या आत जवळपास १ लाख ९८हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लाईक्स मिळालेल आहेत.

मैं इश्क में हू हे गाणे राधे श्याम सिनेमातील इतर गाण्यांपेक्षा वेगळं ठरलं आहे. गाण्यात प्रभास आणि पूजा सुदंर सेटअपमध्ये बॉल डान्स करताना दिसत आहेत. परंतु गाण्यात दोघांच्या चेहऱ्यावरची खुशी काही दिसत नाहीये. प्रेमात आलेले अडथळे या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिनेमाच्या टीझरमधूनही दोघांच्या ही छटा पाहायला मिळाली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

सिनेमात अभिनेता प्रभास आदित्य नावाची भूमिका साकारणार आहे. आदित्यच्या आयुष्यात लग्नाचा योग नाहीये आणि हेच या नव्या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पूजा आणि प्रभास यांच्या प्रेमाने एका नव्या वादाला जन्म घेतलाय आणि याची झलक गाण्यातून दाखवण्यात आली आहे.

- Advertisement -

क्या हमारे प्यार ने इतने बडे भूकंप को जन्म दिया ? जो प्यार जिंदगी दे सकता है, क्या वही प्यार जिंदगी ले भी सकता है ? असे प्रभास गाण्यात म्हणतोय. राधे श्याम सिनेमाचे मनाला स्पर्शून जाणारे आणखी एक गाणे रिलीज झाले आहे, या गाण्याचा नक्की अनुभव घ्या. असे म्हणत प्रभासने नवं गाणं शेअर केलं आहे.


हेही वाचा – महिला दिनानिमित्ताने ‘अनन्या’चे पोस्टर आऊट; ह्रता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -