बाहुबली या चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोहचलेला अभिनेता म्हणजे प्रभास. बाहुबली सिनेमातून प्रभासने प्रेक्षकांच्या मनात घर केले. यानंतर प्रभासचे अनेक सिनेमे हिट गेले. त्यामुळे देशासह जगभरात प्रभासचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे प्रभासच्या लोकप्रियतेबरोबरचं त्याच्या संपत्तीतही वाढ होत आहे. प्रभासला गाड्यांची प्रचंड क्रेझ असल्याने त्याच्या गाड्यांच्या ताफ्यात आणखी एक नवी कोरो महागडी कार सामिल झाली आहे.
प्रभासकडे सध्या कोट्यावधीमच्या कार आहेत. यात त्याने आता तब्बल सहा कोटींची अलिशान कार खरेदी केली आहे. प्रभासने लॅम्बोर्गिनी एवेनटेडर रोडस्टर ही कार खरेदी केली आहे. प्रभासने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून कारसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. प्रभासने हैदराबादमध्ये ही कार चालवली असल्याचे देखील दिसत आहेत. ही कार खरेदी करत प्रभासने आपल्या दिवंगत वडील सूर्य नारायण यांचे स्वप्न पूर्ण केले आहे.
१२ फेब्रुवारी २०१० मध्ये प्रभासच्या वडीलांचे निधन झाले. मात्र आता प्रभासने वडील सूर्य नारायण राजू यांच्या वाढदिवसानिमित्त ही कार घेतली आहे. आज १० वर्षानंतर प्रभास सिनेसृष्टीत एक सुपरस्टार म्हणून वावरतो. त्यामुळे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी प्रभास एक आहे. लवकरचं प्रभासचा आदिपुरुष चित्रपच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभाससह बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटाचीही घोषणा झाली आहे. या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे.