घरमनोरंजन'साहो तमीळमध्ये डब करा', चाहत्याने केली मागणी!

‘साहो तमीळमध्ये डब करा’, चाहत्याने केली मागणी!

Subscribe

अभिनेता प्रभासची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे आणि त्याच्या लोकप्रियतेला स्थळ, भाषा आणि प्रदेशिकतेच बंधन नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नुकतीच प्रदर्शित झालेला त्याचा चित्रपट साहो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि बॉक्स ऑफिसवर देखील हा चित्रपट हिट ठरला. प्रभासने आपल्या आकर्षक देहयष्टीचे साहो चित्रपटात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत चाहत्यांची मने जिंकली. बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबतचा साहो चित्रपट हे त्याचे बॉलीवुड पदार्पण होते.

- Advertisement -

देशाच्या कानाकोप-यातून चाहत्यांनी एक्शनने या चित्रपटाला भोजपुरीमध्ये डब करण्याची मागणी केली आहे. या चित्रपटाला हिंदी, तमिल आणि तेलुगु भाषांमध्ये सर्वप्रथम प्रदर्शित करण्यात आले होते. भोजपुरी भाषेची ही मागणी अभिनेता प्रभासच्या लोकप्रियतेला स्थळ, भाषा आणि प्रदेशिकतेच बंधन नसल्याचेच सिद्ध करते आहे.

- Advertisement -

नुकताच, हा चित्रपट जपानमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आला होता. तिथे देखील चाहत्यांनी आपल्या या आवडत्या एक्शन सुपरस्टारवर प्रेमाची लयलूट केल्याचे पहायला मिळाले. प्रभास लवकरच नाग अश्विन यांच्या दिग्दर्शनाखाली बनणा-या आगामी चित्रपटात दिसणार आहे जी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -