गुडघ्यावर बसून प्रभासने कृती सेननला घातली लग्नाची मागणी?

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. परंतु इतकंच नव्हे तर हे दोन्ही कलाकार एकमेकांना डेट करत असल्यामुळे देखील चर्चेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून प्रभास आणि कृती सेनन डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या सेटवरील दोघांचे बॉन्डिंग खूप वाढलं आहे. दरम्यान, या दोघांपैकी कोणीही याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

सध्या कृती सेनन अभिनेता वरुण धवनसोबत तिच्या भेडिया चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याचं दरम्यान, वरुणने कृती आणि प्रभासच्या नात्याची हिंट दिली असल्याचं म्हटलं जातंय. शिवाय आता प्रभास आणि कृती एंगेजमेन्ट देखील करणार असल्याचं समोर आलं आहे.

प्रभासने केलं कृतीला प्रपोज?
वरुण धवनने भेडिया चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हटलं होतं की, कृतीच्या मनात जो व्यक्ती आहे. तो यावेळी मुंबईमध्ये नाही. तो दीपिकासोबत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वरुण प्रभासबद्दल बोलत असल्याचं यामुळे सहज लक्षात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभासने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या सेटवर कृतीला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं आणि कृतीने देखील त्याला हो म्हटलं. असं म्हटलं जातंय की, दोघांच्या घरचे देखील या नात्यामुळे आनंदी आहेत.

‘आदिपुरूष’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

‘अवतार’ चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांना भारतीय संस्कृतीची भुरळ