घरताज्या घडामोडीRadhe Shyam: अखेर प्रभासच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली, 'राधेश्याम' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

Radhe Shyam: अखेर प्रभासच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली, ‘राधेश्याम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला

Subscribe

दाक्षिणात्य चित्रपटातील लोकप्रिय अभिनेता प्रभास ‘बाहुबली’ चित्रपटामुळे यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. प्रभासने ‘बाहुबली’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर निर्माण केलं आहे. यानंतर त्याचे बरेच चित्रपट हिट झाले आहेत. सध्या त्याच्या चाहत्यांना नवा चित्रपट ‘राधेश्याम’ची प्रतिक्षा होती. मात्र आज अखेर चाहत्यांची ही प्रतिक्षा संपली असून ‘राधेश्याम’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. ‘राधेश्याम’ चित्रपटाचा पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारिख जाहीर करण्यात आली आहे.

अभिनेता प्रभासने आपल्या सोशल मीडियावर ‘राधेश्याम’ चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रभास डेपर लूकमध्ये युरोपच्या रस्त्यावर चालताना दिसत आहे. ‘राधेश्याम’ चित्रपट मकर संक्रांती आणि पोंगलच्या दिवशी १४ जानेवारी २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा चित्रपट असणार आहे, असे काही लोकांचे म्हणणे आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

या चित्रपटात प्रभास रोमँटिक अंदाजात दिसत आहे. प्रभाससोबत या चित्रपटात पूजा हेगडे दिसणार आहे. पहिल्यांदाच प्रभास आणि पूजाची जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. ‘राधेश्याम’ बहुभाषी चित्रपट आहे. गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत ‘राधेश्याम’ चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. तसेच निर्मिती यूवी क्रिएशन्सची असून भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद हे चित्रपटाचे निर्माते आहेत.


हेही वाचा – ऋतिक रोशनने स्वत:चा फोटो शेअर करत विचारला कियारा आडवाणीला प्रश्न, चाहते झाले हैराण


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -