घरमनोरंजनप्रभासच्या 'साहो'चे फर्स्ट पोस्टर

प्रभासच्या ‘साहो’चे फर्स्ट पोस्टर

Subscribe

प्रभासने या आधी केलेला बाहुबलीचा गेटअप आधी देखील चर्चिला गेला आहे. त्याचा बिल्ला या सिनेमातील लूकही तितकाच खास होता. आता या सिनेमातील प्रभासचा लूक हा तितकाच डॅशिंग आहे.

‘अमरेंद्र बाहुबली यान मै’… असे म्हणत हवेत हात उंचावणारा बाहुबली अर्थात प्रभासने अवघ्या देशाला वेड लावून टाकले. आता प्रभासचा नवा सिनेमा कधी येणार अशी प्रतिक्षा प्रभासचे फॅन्स करत असताना प्रभासचा ‘साहो’ हा सिनेमा येणार असल्याची घोषणा त्याच्या बाहुबली २ या सिनेमादरम्यानच करण्यात आली होती. त्यानंतर प्रभासच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याचा साहोचा फर्स्ट लूक थोडक्यात दाखवण्यात आला होता. आणि आता या सिनेमाचे पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे. सोबत या सिनेमाची रिलीजची तारीखदेखील निश्चित करण्यात आली आहे.

पोस्टरमधील प्रभासचा लूक

प्रभासने या आधी केलेला बाहुबलीचा गेटअप आधी देखील चर्चिला गेला आहे. त्याचा बिल्ला या सिनेमातील लूकही तितकाच खास होता. आता या सिनेमातील प्रभासचा लूक हा तितकाच डॅशिंग आहे. या पोस्टरमध्ये तो एका लाँग काळ्या जॅकेटमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

सिनेमाची रिलीज डेट ठरली

साहोचे फर्स्ट ऑफिशिअल पोस्टर रिलीज करत UV क्रिएशनने या सिनेमाच्या रिलीजची तारीखगी सांगितली आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. हिंदी आणि तेलगू या दोन्ही भाषांमध्ये एकाचवेळी रिलीज होणार आहे. या सिनेमात प्रभाससोबत श्रद्धा कपूर आहे. या शिवाय या सिनेमात नील नितीन मुकेश, एव्हिलीन शर्मा, महेश मांजरेकर, चंकी पांडे, आदित्य श्रीवास्तव अशी स्टारकास्ट असणार आहे.

- Advertisement -
(सौजन्य-uv creations)

बीग बजेट सिनेमा

दक्षिणेतील सिनेमे हा कायमच अॅक्शननी भरलेले असतात. त्यांच्या सिनेमाचे बजेटही तितकेच तगडे असते. प्रभासच्या ‘साहो’ या सिनेमाचे बजेटही मोठे आहेत. हा सिनेमा ३०० कोटींचा आहे. या सिनेमात भरपूर VFX वापरणयात आले आहेत. या सिनेमानंतर प्रभास आणखी एका सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा रोमँटिक असणार आहे . या सिनेमाचे नाव ‘प्रभास२०’ आहे. यात प्रभाससोबत पूजा हेगडे लीड रोलमध्ये दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -