बाहुबलीने बेबोसाठी पाठवली स्पेशल बिर्याणी

prabhas sends special biryani to kareena kapoor
बाहुबलीने बेबोसाठी पाठवली स्पेशल बिर्याणी

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानचा आगामी चित्रपट ‘आदिपुरुष’ची घोषणा झाली आहे. या चित्रपटाचे काम सुरू होण्यापूर्वीच प्रभास सैफच्या कुटुंबियांसोबत चांगलं नातं बनवतं आहे. दरम्यान प्रभासने बेबो म्हणजेच सैफ अली खानची बायको करीना कपूरच्या घरी स्पेशल बिर्याणी पाठवली. ज्याचा फोटो करीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

करीनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोअरीवर बिर्याणीचा फोटो शेअर करून लिहिले आहे की, ‘चला खाऊया..जेव्हा बाहुबली आपल्याला बिर्याणी पाठवेल तर ती खूपच बेस्ट असेल. धन्यवाद प्रभास. या जेवणासाठी.’ या पोस्टमध्ये करीनाने चित्रपट आदिपुरुष (#Adipurush)ला टॅग केले आहे. हे स्वादिष्ट जेवण पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, करीनाने प्रभासच्या या स्वीट जेस्चरचा आनंद घेतला असेल.

प्रभासचे करीनासोबत हे पहिलेच इंटरॅक्शन आहे, जे अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सध्या प्रभास बॉलिवूडच्या काही कलाकारांसोबत काम करत आहे. प्रभास ‘साहो’ चित्रपटात श्रद्धा कपूर आणि जॅकलीन फर्नांडिससोबत दिसल्यानंतर आता कृति सेनन आणि दीपिका पादुकोण सारख्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत चित्रपट करत आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास सैफ अली खान आणि कृति सेननसोबत दिसणार आहे.

करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ वेलेंटाइन डे दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉलीवूडचा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर खान आणि करीना पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – ‘मुलींच्या लहान कपड्यांमुळे उद्धवस्त झाले माझे करिअर’; बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याचा खुलासा