घर मनोरंजन ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी प्रभासने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनापूर्वी प्रभासने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

Subscribe

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. नुकत्याच काही ‘आदिपुरुष’चा ट्रेलर आणि चित्रपटातील गाणी प्रदर्शित झाली होती ज्याला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटाची टीम जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, अशातच समोर आलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे निर्माते तिरुपतीमध्ये एका भव्य प्री-रिलीझ कार्यक्रम आयोजित करणार आहेत. याकार्यक्रमापूर्वी प्रभासचे तिरुपती बालाजीच्या मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रभासने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

- Advertisement -

टॉलिवूड सुपरस्टार प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन यांच्या बहुचर्चित आदिपुरुष चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी कृती सेननने काळा राम मंदिराला भेट दिली होती. कृतीनंतर आता प्रभासने देखील तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. सध्या त्याचे यावेळचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंतील प्रभासचा साधा, सुंदर लूक पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 2 कोटींचा खर्च

मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी निर्माते 2 कोटींचा खर्च करणार आहेत. ही मोठी रक्कम निर्माते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खर्च करणार आहेत. शिवाय यात निर्माते रिलीजपूर्वीच्या इव्हेंटमध्ये फक्त फटाक्यांवर 50 लाख रुपये खर्च करणार आहेत. या चित्रपटाचे हक्क आदिपुरुषने तेलुगु थिएटरला जवळपास 170 कोटींना विकले आहेत. शिवाय या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी देखील कमाई केली आहे.

चित्रपट ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार

- Advertisement -

ओम राउत यांच्या दिग्दर्शनात तयार करण्यात आलेल्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाने प्रभास श्रीरामाच्या मुख्य भूमिकेत होता. तर सीतेच्या भूमिकेत अभिनेत्री कृति सेनन आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 16 जून 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा : छत्रपतींच्या कार्यकर्तृत्वाची असामान्य गाथा ‘सिंहासनाधिश्वर’ रुपेरी पडद्यावर

- Advertisment -