दिल्लीतील रामलीलेमध्ये प्रभास करणार रावण दहन

शारदीय नवरात्रीचे 9 दिवस संपल्यानंतर दहाव्या दिवशी विजया दशमी साजरी केली जाते. दसऱ्याच्या निमित्ताने भारतातील अनेक ठिकाणी रामलीला आणि रावण दहनाचे आयोजन केले जाते. या नाटकांमध्ये अनेक सामान्य नागरीक आवडीने भाग घेतात. परंतु बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील यामध्ये आवडीने भाग घेतात. दरम्यान, सध्या सगळीकडे प्रभासच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. याचं निमित्ताने दिल्लीतीमधील लव कुश रामलीलामध्ये प्रमुख पाहूणे म्हणून प्रभास पोहोचणार आहे आणि यावेळी तो रावण दहन देखील करणार आहे. याआधी अजय देवगण सारखे कलाकार देखील रामलीलेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. परंतु, आज आम्ही तुम्हाला त्या अभिनेत्यांबद्दल सांगणार आहोत. ज्यांनी रामलीलेमध्ये सहभाग देखील घेतला आहे आणि वेगवेगळ्या भूमिका देखील साकारल्या आहेत.

रामलेलीमध्ये हे कलाकार होतात सहभागी

  • रामपाल यादव


आपल्या विनोदाने सर्वांना हसवणारे राजपाल यादव यांनी आपल्या अभिनयाची सुरूवात रामलीलेमधूनच केली होती. शाहजहापूर ऑर्डिनेंस क्लॉथिंग फॅक्ट्रीमध्ये अनेक वर्षांपासून रामलीलेचं आयोजन केले जाते. ज्यामध्ये कॉमेडियन रामपाल यादवने सहभाग घेतला होता. राजपाल यादवने यामध्ये अंगद ही भूमिका साकारली होती. ज्यानंतर राजपाल यादवच्या अभिनय क्षेत्राला सुरूवात झाली.

  • अरूण गोविल आणि दीपिका चिखलिया


अरूण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनी 90 च्या दशकात साकारलेल्या रामायण मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यंदा 34 वर्षानंतर पुन्हा एकदा दसऱ्याच्या निमित्ताने हे दोन कलाकार दिल्लीतील कडकडडूमा मधील रामलीलेच्या मंचावर जुन्या आठवणी ताज्या करणार आहेत.

  • रजा मुराद


गेल्या वर्षी अयोध्येमध्ये रामलीलेचे उत्तम आयोजन करण्यात आले. दसऱ्याच्या निमित्ताने या रामलीलेमध्ये बॉलिवूड कलाकारांनी भाग घेतला होता. रजा मुराद यांनी या नाटकामध्ये कुंभकरण ही भूमिका साकारली होती.

  • रवि किशन

भोजपुरू चित्रपटांचे अभिनेते आणि भाजपा नेता रवि किशन यांनी अयोध्येमध्ये झालेल्या रामलीलामध्ये गेल्या वर्षी भाग घेतला होता. त्यांनी यामध्ये परशुराम ही भूमिका साकारली होती.


हेही वाचा :

फोन भूत चित्रपटात कतरीना कैफ दिसणार ‘या’ भूमिकेत