HomeमनोरंजनPrabhas : फौजी सिनेमात प्रभास साकारणार इंग्रज सेनाधिकाऱ्याची भूमिका

Prabhas : फौजी सिनेमात प्रभास साकारणार इंग्रज सेनाधिकाऱ्याची भूमिका

Subscribe

सिनेविश्वाचा बाहुबली अर्थात दाक्षिणात्य सिनेस्टार प्रभास हा त्याचा आगामी सिनेमा ‘फौजी’मूळे प्रचंड चर्चेत आहे. प्रभासचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून त्याच्या आगामी सिनेमाबाबत त्यांची उत्सुकता पाहण्याजोगी आहे. मध्यंतरी प्रभासचा ‘फौजी’ हा सिनेमा बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘वीर – जारा’ने प्रेरित असल्याचे बोलले गेले. याविषयीच्या सर्व चर्चांना दिग्दर्शक हनु राघवपुडी यांनी अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले, ‘हा सिनेमा पूर्णपणे नवीन आणि नवनिर्मित कथानकावर आधारलेला आहे’. तसेच या सिनेमात प्रभास ब्रिटिश आर्मीच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. (Prabhas will play the role of British army officer in Fauji)

‘फौजी’ सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता

सुपरस्‍टार प्रभासने गेल्या काही काळात सलग हिट सिनेमे दिले आहेत. यात आता आणखी एका हिट सिनेमाची भर पडण्याची शक्यता आहे. येत्या काळात अभिनेत्याचा ‘सलार पार्ट 2’ हा सिनेमा येणार आहे. शिवाय ‘द राजा साब’, ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि 2898 AD पार्ट 2’ हे सिनेमे देखील पाईपलाईनमध्ये आहेत. अशातच दिग्दर्शक हनु राघवपुडी यांचा सिनेमा ‘फौजी’ सर्वाधिक चर्चेत आहे. या सिनेमात प्रभास एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांना या सिनेमाची विशेष प्रतीक्षा आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘फौजी’ या सिनेमाचा शाहरुखच्या ‘वीर- जारा’शी काही एक संबंध नाही. तसेच हनु राघवपुडी यांनी सांगितले, ‘हा सिनेमा पूर्णपणे वेगळा आहे. त्याची गोष्ट नव्याने लिहिलेली आहे. या सिनेमात तुम्हाला ऍक्शन आणि रोमांस दोन्ही पहायला मिळेल. हा एक फुल्ल पॅकेज्ड सिनेमा असणार आहे. जो एक पीरियड ड्रामा आहे. या सिनेमात प्रभास इंग्रज सेनाधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे’.

मिथुन चक्रवर्ती, जया प्रदा साकारणार महत्वाच्या भूमिका

‘फौजी’ या सिनेमाच्या गोष्टीचा मूळ प्‍लॉट सन 1945 चा आहे. यात प्रभास ब्रिटिश आर्मीच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. प्रभाससोबत या सिनेमातून बॉलिवूड अभिनेता मिथुन चक्रवर्ती आणि जया प्रदादेखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातील एक्‍शन- सीक्‍वेंसचे चित्रीकरण लार्जर- दॅन- लाईफ अंदाजात केले जाणार आहे. सध्या हैदराबादमध्ये रामोजी फिल्‍म सिटीत हे चित्रीकरण सुरु आहे.

शूटिंग दरम्यान अभिनेता जखमी

मध्यंतरी ‘फौजी’ सिनेमाच्या ऍक्शन सीनचे चित्रीकरण सुरु असताना प्रभासला गंभीर दुखापत झाली होती. रिपोर्ट्सनुसार, यावेळी अभिनेत्याच्या घोट्याला जबर मार लागला होता आणि ही दुखापत बरीच गंभीर होती. या दुखापतीमुळे प्रभासला त्याचा जपान दौरादेखील रद्द करावा लागला होता. जिथे तो त्याच्या ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित राहणार होता.

हेही पहा –

Junaid Khan : आमीरच्या एक्स पत्नींसाठी केलेल्या विधानाचा जुनैदला होतोय पश्चाताप